विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत विमुक्त जाती दिन उत्साहात! येवल्यात राज्य भटके विमुक्त जाती संघाचा स्तुत्य उपक्रम

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत विमुक्त जाती दिन उत्साहात! येवल्यात राज्य भटके विमुक्त जाती संघाचा स्तुत्य उपक्रम
Published on
YEO26B26540 येवला : स्वामी मुक्तानंद विद्यालयात भटके विमुक्त जाती दिनानिमित्त विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करताना संघटनेचे पदाधिकारी. ---------------- विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत विमुक्त जाती दिन उत्साहात ः येवल्यात राज्य भटके विमुक्त जाती संघाचा स्तुत्य उपक्रम -------------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता.२ : विमुक्त जाती दिन येथे उत्साहात साजरा करत त्याचे औचित्य साधून राज्य भटके विमुक्त जाती संघातर्फे शहरातील स्वामी मुक्तानंद विद्यालय येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्य, मिठाई आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रतिमापूजन करून महापुरुषांच्या कार्याचा जयघोष करण्यात आला. संघटनेचे राज्य संघटक संतोष राऊळ यांनी विमुक्त जाती दिनाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. संघटनेचे संस्थापक लोकनेते जी. जी. चव्हाण व राष्ट्रीय अध्यक्षा कल्पना पांडे यांच्या नेतृत्वाखाली शासन दरबारी समाजाच्या न्याय-हक्कासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यालयाचे खजिनदार तेजस गायकवाड, उपप्राचार्य रामदास खैरनार, अरुण थोरात, कार्यकर्ते मुकुंद पवार, नवनाथ पोळ, संतोष मोडवे, राजू भालेराव, अतुल भालेरे, दीपक राऊळ, आदित्य राऊळ, जगदीश वैद्य, सागर राऊळ, वाल्मीक सूर्यवंशी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते. उपप्राचार्य रामदास खैरनार यांनी संघटनेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत आभार मानले. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com