हास्य-विनोद,मार्गदर्शन अन आनंदाच्या जल्लोषात समताचा स्नेहमेळावा येवल्यात समता पतसंस्थेच्या सभासद मेळाव्यात देशमुख यांचे व्याख्यान

हास्य-विनोद,मार्गदर्शन अन आनंदाच्या जल्लोषात समताचा स्नेहमेळावा  येवल्यात समता पतसंस्थेच्या सभासद मेळाव्यात देशमुख यांचे व्याख्यान
Published on
YEO26B26543 येवला : समता नागरी पतसंस्थेच्या सभासद मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष काका कोयटे,प्रभाकर झळके आदी. ----------------- हास्यविनोद, मार्गदर्शन अन जल्लोषात स्नेहमेळावा येवल्यात समता पतसंस्थेच्या सभासद मेळाव्यात देशमुख यांचे व्याख्यान सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१ : ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक आनंदी, सकारात्मक आणि तणावमुक्त व्हावे, या उद्देशाने समता नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे ‘हसत खेळत तणावमुक्ती’ या व्याख्यानातून प्रसिद्ध व्याख्याते अशोक देशमुख यांनी मिश्कील व संवादात्मक शैलीत मार्गदर्शन केले. हास्य-विनोद, मार्गदर्शन अन आनंदाच्या जल्लोषात समताचा स्नेहमेळावा अधिक संस्मरणीय ठरला. ----------- पतसंस्थेच्या येथील टिळक मैदानातील श्री मुरलीधर मंदिरात सभासद स्नेहमेळावा झाला. दैनंदिन जीवनातील ताणतणावांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे, आनंदी राहणे आणि प्रसन्न जीवनशैली अंगीकारण्याविषयी श्री. देशमुख यांनी विनोदांच्या माध्यमातून संदेश दिला. सभासद, ज्येष्ठ नागरिक, महिला व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हास्य-विनोद, मार्गदर्शन आणि आनंदाच्या वातावरणामुळे विशेष रंगत आली. व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, उपाध्यक्ष अरविंद पटेल, संस्थेचे ज्येष्ठ संचालक जितुभाई शहा, सरव्यवस्थापक सचिन भट्टड, सुहासिनी कोयटे,ज्योत्स्ना पटेल तसेच अर्जुन कोकाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सभासदांशी संवाद साधत संस्थेचा आर्थिक लेखाजोखा मांडला. पतसंस्थेची भक्कम आर्थिक स्थिती, सभासद व ठेवीदारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. समता उद्यान, निराधारांना भोजन, अनाथांसाठी आश्रय, आरोग्य मंदिर, योग भवन, समता इंटरनॅशनल स्कूल आणि समता अभ्यास मंदिर यांसारख्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली. संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद पटेल यांनी पतसंस्थेच्या कारभाराची माहिती देत सभासदांचा विश्वास कायम राखण्यासाठी संचालक मंडळ सातत्याने दक्ष असल्याचे सांगितले. संस्थेच्या कारभारात कोणत्याही गैरप्रकाराला वाव मिळू नये, यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com