YEO26B26558
पारेगाव : येथील सप्ताहाच्या प्रारंभाप्रसंगी पूजन करताना खासदार भास्कर भगरे व विविध पदाधिकारी.
------------------
३०-२
पारेगाव येथे परंपरा जपत
हरिनाम सप्ताहाला सुरुवात
खासदार भगरेंच्या उपस्थितीत विनापूजन
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.२ : पारेगाव येथील ग्रामस्थांतर्फे चौदा वर्षापासून होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला थाटामाटात सुरुवात झाली. खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते विनापूजन व ध्वजरोहण करून सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. ग्रामस्थांनी येथील धार्मिक उपक्रमांची परंपरा सांगत या सप्ताहात होणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. ॲड. कृष्णा काळे यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सभा मंडप करून देण्याची मागणी केली. खासदार भगरेंनी तात्काळ होकार देत सभा मंडपाची मागणी पूर्ण केली जाईल असे आश्वासन दिले.
सप्ताहाचे चौदावे वर्ष असून सकाळी काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ व रात्री महाराष्ट्राच्या विविध भागातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन आयोजित केले जाणार आहे. सप्ताहाची सांगता मंगळवारी (ता.८) होणार असून डॉ. सोमनाथ महाराज पाटील यांचे काल्याचे किर्तन होणार आहे
ज्येष्ठ नेते जनार्दन खिल्लारे, उत्तम बंड, बापूसाहेब पोटे, संतोष काळे, बाबासाहेब खिल्लारे, योगेश काळे, बाबूलाल गुजर, शिवाजी पाठे, सोमनाथ पाठे, दौलत सुरासे, गोटीराम पाठे, अशोक पाठे, बाळासाहेब खिल्लारे, सुनील कुमावत, रावसाहेब वाळके, किरण वाळके, हरिश गांगुर्डे, नवनाथ वाळके, सुनील कुमावत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
--------------