विज्ञान नाट्योत्सवात एन्झोकेम हायस्कूल येवला तालुक्यात प्रथम

विज्ञान नाट्योत्सवात एन्झोकेम हायस्कूल येवला तालुक्यात प्रथम
Published on
26585 येवला : विज्ञान नाट्यस्पर्धेत विजयी झालेले एन्झोकेम विद्यालयाचे विद्यार्थी. समवेत शिक्षक विज्ञान नाट्योत्सवात एन्झोकेम हायस्कूल प्रथम सकाळ वृत्तसेवा येवला, ता. ४ : अंतराळातील भविष्यातील मानवी जीवनाची संकल्पना आणि त्यामागील वैज्ञानिक शक्यता प्रभावीपणे मांडणाऱ्या ‘अंतराळातील मानवी वस्ती’ या विज्ञाननाट्याने एन्झोकेम हायस्कूलला तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून दिला. या कामगिरीमुळे विद्यालयाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ, येवला संचलित एन्झोकेम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी अंतराळातील मानवी वस्ती या विषयावर उत्कृष्ट विज्ञाननाट्य सादर केले. इयत्ता ९ वीमधील भूमी असुले, सायली शेटे, सुप्रिया जानकर, कांचन खामकर, करिष्मा पवार, अपूर्वा आव्हाड, संस्कृती कुऱ्हे व ईश्वरी घोडके या विद्यार्थिनींनी प्रभावी अभिनयातून अंतराळातील मानवी वस्तीची संकल्पना उलगडून दाखविली. शिक्षिका योगिता विसपुते यांनी नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केले. विज्ञान विभागप्रमुख पुष्पा कांबळे तसेच पौर्णिमा खैरनार, शामला क्षीरसागर, योगिता महाले, शीतल महाजन, शीतल शिंदे या विज्ञान शिक्षकांनी विद्यार्थिनींना केले. नेपथ्य व वेशभूषेची जबाबदारी सतीश विसपुते यांनी सांभाळली. संस्थेचे अध्यक्ष पंकज पारख, सरचिटणीस सुशील गुजराथी, उपाध्यक्ष डॉ. मनीष गुजराथी, कोषाध्यक्ष अशोक शहा, प्रशासनाधिकारी दत्ता महाले, प्राचार्य अनिल शेलार, उपप्राचार्य कैलास धनवटे, पर्यवेक्षक विजय क्षीरसागर आदींनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com