आगळावेगळा शिक्षक दिन...संस्थाचालकांकडून विद्यालयाला लाखमोलाची देणगी! गौरव

आगळावेगळा शिक्षक दिन...संस्थाचालकांकडून विद्यालयाला लाखमोलाची देणगी! गौरव
Published on
पान-४ साठी ------------- YEO26B26592 येवला : स्वामी मुक्तानंद विद्यालयात शिक्षकांचा गौरव करताना संस्थेचे पदाधिकारी. -------------- ३६-५ संस्थाचालकांकडून विद्यालयाला लाखमोलाची देणगी! स्वामी मुक्तानंद विद्यालयाला डॉ. अमृत पहिलवान यांनी दिली १ लाखाची देणगी, आदर्श शिक्षकांचा झाला गौरव -------------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता.५ : शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान, विद्यार्थ्यांकडून एकदिवसीय अध्यापनाचा अनोखा उपक्रम आणि संस्थाचालकांकडून विद्यालयाच्या विकासासाठी लाखमोलाची देणगी, अशा विविध उपक्रमांनी श्रीगुरुदेव शिक्षण प्रसारक संस्थेच्या स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन आगळावेगळ्या पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमृत पहिलवान यांनी त्यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमातून जमा झालेली १ लाख ८ हजार रुपयांची संपूर्ण रक्कम विद्यालयाच्या विकासासाठी दान करत शिक्षकदिनानिमित्त सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. (कै) सारंगधरसा पहिलवान मेमोरिअल ट्रस्टतर्फे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते गुरुवर्य (कै) प्र. सा. पहिलवान यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ‘आदर्श पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. डॉ. किशोर पहिलवान यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यक्रमात प्रा. डॉ. अनिल कुमावत, सौ. भागवत व सेवक कर्मचारी संतोष सोपे यांचा सन्मान करण्यात आला. हिंदी सक्तीची परीक्षा रद्द करण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल डॉ. प्रसादशास्त्री कुळकर्णी यांचाही विशेष गौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमृत पहिलवान, सचिव डॉ. किरण पहिलवान, खजिनदार तेजस गायकवाड, सहसचिव संजय नागडेकर, संचालक डॉ. अमोल पहिलवान, प्रवीण नागडेकर, सभासद दत्तात्रय नागडेकर, शकुंतला पहिलवान, प्रेमचंद पहिलवान, ईश्वर पहिलवान, प्राचार्य राजेंद्र सोनवणे, उपप्राचार्य अंबादास ढोले, उपप्राचार्य आर. टी. खैरनार, पर्यवेक्षक डी. डी. साताळकर, माया हादगे, एस. बी. देवरे आदी उपस्थित होते. डॉ. प्रसादशास्त्री कुळकर्णी, डी. आर. नारायणे व एम. डी. परदेशी यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक डी. डी. साताळकर यांनी आभार मानले. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com