मांजरपाडा प्रकल्पाला अधिकचे पाणी मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू..!

मांजरपाडा प्रकल्पाला अधिकचे पाणी मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू..!
Published on
पान-४ येवला : येथील संपर्क कार्यालयात शेतकरी व पदाधिकाऱ्यांची संवाद साधताना माजी खासदार समीर भुजबळ.समवेत पदाधिकारी. -------------- मांजरपाडा प्रकल्पाला अधिकचे पाणी मिळवू समीर भुजबळ : पाण्यासह विजेचे प्रश्न सोडविण्याची शेतकऱ्यांना गाव्ही सकाळ वृत्तसेवा येवला, ता.५ : मांजरपाडा प्रकल्प साकारण्यात येऊन तालुक्याची दुष्काळी ओळख पुसण्याचे काम सुरू आहे. सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मांजरपाडा प्रकल्पाला अधिकचे पाणी मिळवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. पाण्याची उपलब्धता करून संपूर्ण तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. महापारेषणचे ५० एमव्हीए क्षमतेचे अतिउच्च दाब केंद्र निर्माण करून तालुक्याचा विजेचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांगितले. नगरसूल आणि पाटोदा गटांतील विविध प्रश्नांबाबत शेतकरी बांधवांनी संपर्क कार्यालयात श्री. भुजबळ यांची भेट घेऊन विविध मागण्या मांडल्या. प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, माजी सभापती संभाजी पवार, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, अरुण थोरात, डॉ. सुधीर जाधव, कांतीलाल साळवे, मोहन शेलार, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, सुनील पैठणकर, अल्केश कासलीवाल, ॲड. मंगेश भगत आदी उपस्थित होते. श्री. भुजबळ म्हणाले, नगरसूल परिसरात शेतकऱ्यांना विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने कार्यवाही करून पुढील आठ दिवसात वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल. तालुक्यातील विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपकेंद्र आणि इतर कामे सुरू आहे. मंत्री भुजबळ यांच्या माध्यमातून महापारेषणचे ५० एमव्हीए क्षमतेचे अतिउच्च दाब केंद्र निर्माण करून तालुक्याचा विजेचा प्रश्न कायम स्वरुपी निकाली काढण्याचे प्रयत्न आहे. मंत्री भुजबळांच्या माध्यमातून मांजरपाडा प्रकल्प साकारण्यात आला आहे. यावर्षी अल निनोचा प्रभाव असल्याने पाऊस कमी झालेला आहे. तरी देखील आलेल्या पाण्याचे योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शेतकरी बांधवांनी देखील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. या प्रकल्पाचे पाणी डोंगरगाव साठवण तलावापासून बंधारे भरत भरत शेवटपर्यंत बंधारे सर्व भरण्याचे नियोजन आहे. मात्र अनेक ठिकाणी गेट उघडून बंधारे भरण्यात आले. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी पोहचू शकले नाही. त्यामुळे यामध्ये शेतकरी बांधवांनी सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com