पान-४ ॲंकर
----------------
YEO26B26663
एकलहरे : राष्ट्रीय रील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेले मातोश्री आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक.
-------------------
राष्ट्रीय रील स्पर्धेत मातोश्री आयुर्वेदला प्रथम क्रमांक
एकलहरे : सर्जनशील रिलमधून आयुर्वेदातील ५० महाकषायांचे प्रभावी दर्शन
-------------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १० : आयुर्वेदातील प्राचीन ज्ञान आधुनिक माध्यमातून प्रभावीपणे मांडत एकलहरे येथील मातोश्री आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली. चरक जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ‘पंचशत महाकषाय : ५० महान औषधी वनस्पती समूहांच्या ज्ञानाचा शोध’ हा विषय सर्जनशील पद्धतीने सादर करत प्रथम क्रमांक पटकावला.
खंडाळ्याच्या साई आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे ही स्पर्धा झाली. आयुर्वेदातील ‘पंचशत महाकषाय’ या महत्त्वपूर्ण संकल्पनेची माहिती प्रभावी दृकश्राव्य माध्यमातून मांडण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर होते. मातोश्री आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या संकल्पनेचे सर्जनशील आणि आकर्षक रीलच्या माध्यमातून प्रभावी सादरीकरण केले.
सहाय्यक प्राध्यापक डॉ. भाग्यश्री लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रितू कनके, श्राव्या शेट्टी, स्वप्नील बच्छाव आणि आदित्य देवकर यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. त्यांच्या कल्पक सादरीकरणाला प्रथम क्रमांक मिळाला. या उल्लेखनीय यशाबद्दल मातोश्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार किशोर दराडे, सरचिटणीस कुणाल दराडे, संचालक रूपेश दराडे, मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. गजानन खराटे, मातोश्री आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धीरज पाटील, डॉ. पूनम जाधव, डॉ. मिनेश चव्हाण, डॉ. स्वप्निल चौधरी, डॉ. नेहा बोगले (हिरे), डॉ. भाग्यश्री लांडगे आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
१६-१
पोषण सप्ताहानिमित्त स्पर्धा
मातोश्री आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय एकलहरे, आयुष विभाग, आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्यातर्फे मातोश्री आयुर्वेद महाविद्यालयात पोषण सप्ताहानिमित्त विविध पाककला स्पर्धा झाल्या. सद्यस्थितीत होणारे आजार व त्यावरील उपयुक्त आहार पदार्थांविषयी विद्यार्थ्यांनी पाककला सादर केल्या. प्राचार्य डॉ. धीरज पाटील, डॉ. पूनम जाधव, डॉ. मिनेश चव्हाण, डॉ. स्वप्निल चौधरी तसेच स्वस्थवृत्त व योग विभाग प्रमुख डॉ. नेहा बोगले (हिरे), डॉ.भाग्यश्री लांडगे आदींनी नियोजन केले.
---------------------