पान-२ ॲंकर
--------
YEO26B26675
येवला : कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी भवनासह विकासकामाचे भूमिपूजनप्रसंगी मंत्री छगन भुजबळ.समवेत माजी खासदार समीर भुजबळ,मारोतीराव पवार,अंबादास बनकर,सभापती वसंत पवार,रतन बोरनारे, कैलास व्यापारे आदी.
---------
बाजार समितीत कृषि, माथाडी भवन उभारणार
----------
मंत्री छगन भुजबळाच्या हस्ते येवला बाजार समितीत विविध विकासकामांचे भूमिपूजन
----------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.११ : चिंचोंडी औद्योगिक वसाहतीमध्ये होणाऱ्या मका प्रक्रिया उद्योगामुळे ५० हजाराहून अधिक मका उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या प्रक्रिया उद्योगामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी, विश्वासार्ह आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार आहे असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येथील बाजार समितीत कृषी भवन, माथाडी भवन उभारण्याची घोषणा त्यांनी केली. बाजार समितीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन, पार्किंग शेडची उभारणी व इतर विकासकामांचे भूमिपुजन मंत्री भुजबळ यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.११) झाले, त्यावेळी ते बोलत होते. खासदार भास्कर भगरे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार मारोतीराव पवार, प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे, नगरध्यक्ष राजेंद्र लोणारी, बाजार समितीचे सभापती वसंत पवार, उपसभापती रतन बोरनारे, सचिव कैलास व्यापारे आदींची उपस्थिती होती.
बाजार समितीत कृषि भवनासाठी १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. आता माथाडी भवन निर्माण करण्यासाठी बाजार समितीने प्रस्ताव तातडीने पाठवावा असे श्री. भुजबळ यांनी सांगितले. ‘चिचोंडी मका प्रकल्पामुळे सुमारे १ हजार प्रत्यक्ष आणि ३ हजारांपर्यंत अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. जवळपास ४ हजार कुटुंबांच्या रोजगाराला आधार देणाऱ्या संधी निर्माण होऊ शकतात. याचा फायदा केवळ कारखान्यात काम करणाऱ्या युवकांना होणार नाही, तर वाहतूक, लॉजिस्टिक्स, पॅकेजिंग, दुरुस्ती, देखभाल, कृषी माल पुरवठा, सेवा क्षेत्र आणि इतर पूरक व्यवसायांनाही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार भगरे, मारोतीराव पवार, ज्येष्ठ नेते बनकर, सभापती पवार यांनी मनोगत व्यक्त केले. हुसेन शेख, ज्येष्ठ नेते अरुण थोरात, विश्वासराव आहेर, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, शहराध्यक्ष दत्ता निकम,किसनराव धनगे, संजय बनकर, प्रमोद सस्कर,प्रवीण बनकर, गणेश शिंदे, गोटू मांजरे, प्रशांत शिंदे, दिपक लोणारी,प्रतिभा शिंदे, संध्या पगारे, संजय पगार, अल्केश कासलीवाल, बापूसाहेब गायकवाड, नंदकिशोर अट्टल, कांतिलाल साळवे, भरत समदडिया, अर्जुन ढमाले,तानाजी आंधळे,अर्जुन कोकाटे, बाळासाहेब गुंड, मोहन शेलार,सचिन कळमकर, मकरंद सोनवणे, नितीन गायकवाड, भास्कर कोंढरे, महेश काळे, अशोक संकलेचा, नाना लहरे, राजेंद्र भांडगे, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, उमेश अट्टल बाजार समितीचे सचिव कैलास व्यापारे आदी उपस्थित होते.
----------------