(कॉमनला 15 पाव पेज जाहिरातींचे पॅकेज आहे.. कृपया आवश्यक...)
------------------------
‘संजीवनी’च्या बँडची
पंतप्रधानांसमोर सलामी
------------
राष्ट्रीय एकता परेडमध्ये बहुमान
------------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.११ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुजरामध्ये (एकतानगर) ३१ ऑक्टोबरला होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिवस सोहळ्यातील एकता परेडमध्ये कोपरगाव येथील संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या मुलांच्या ब्रास बँड पथकाला स्कूल बँड डिस्प्ले अंतर्गत सहभागी होण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे.
गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय एकात्मता विभागाने अधिकृत पत्राद्वारे शालेय बँड पथकांमधून संजीवनी सैनिकी स्कूलच्या पथकाची केलेली ही निवड संस्थेच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाची, सांगीतिक गुणवत्तेची आणि विद्यार्थ्यांच्या राष्ट्रनिष्ठेची राष्ट्रीय पातळीवरील दखल आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात विश्वस्त सुमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘संजीवनी’च्या गुणवत्तेचा गौरवपूर्ण निनाद घुमविणार आहे. कोपरगावच्या ग्रामीण भूमीतून घडलेले हे विद्यार्थी थेट राष्ट्रीय मंचावर आपल्या कर्तृत्वाची अमिट छाप उमटविणार आहेत. या प्रतिष्ठेच्या संधीमुळे संजीवनी परिवारासह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
------------------
कोट
संजीवनी सैनिकी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ब्रास बँड स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या यशानंतर आता राष्ट्रीय एकता परेडसाठी निवड मिळवून पुन्हा एकदा आपल्या गुणवत्ता, शिस्त, समर्पण आणि राष्ट्रप्रेमाचा ठसा उमटविला आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय मंचावर निर्माण केलेला हा गौरव संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.
- नितीन कोल्हे, अध्यक्ष, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, कोपरगाव