छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी विचार प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचायला हवा..! फिल्मचे उद्धाटन

छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी विचार प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचायला हवा..! फिल्मचे उद्धाटन
Published on
YEO26B26679 येवला : लढा शिवजयंतीचा या शॉर्ट फिल्मच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांचा सत्कार करताना सुभाष पाटोळे, संजीव सोनवणे. शेजारी अंबादास बनकर, मारोतराव बनकर. ---------- येवल्यातील शिवजयंतीच्या लढ्यावर शॉटफिल्म ---------- मंत्री भुजबळांच्या हस्ते उद्घाटन ः (स्व) गोविंदराव पाटोळे यच्या लढ्याची माहिती -------- येवला, ता.११ : छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा अन्यायाविरुद्धचा होता. त्यांचा सर्वसमावेशक आणि प्रेरणादायी विचार प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे. येवल्यातील शिवजयंती उत्सवाच्या जडणघडणीत पाटोळे कुटुंबीयांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले. मंत्री भुजबळांच्या हस्ते शहरातील लक्ष्मी थिएटर येथे (स्व) गोविंदराव पाटोळे यांच्या यशोगाथेवर आधारित ‘लढा शिवजयंतीचा’ या शॉर्ट फिल्मचे उद्धाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. पाटोळे परिवारातील सुभाष पाटोळे, युवराज पाटोळे तसेच लेखक दिग्दर्शक संजीव सोनवणे यांच्या पुढाकाराने ही फिल्म बनविण्यात आली आहे. ‘शहरातील शिवजयंती उत्सवाला तब्बल ९१ वर्षांची गौरवशाली परंपरा आहे. या ऐतिहासिक उत्सवाची सुरुवात (स्व) गोविंदराव पाटोळे यांनी केली. त्यानंतर पाटोळे कुटुंबीयांनी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी ही परंपरा अत्यंत निष्ठेने आणि सातत्याने पुढे चालविली. त्यामुळे शिवजयंती उत्सवाच्या जडणघडणीत पाटोळे कुटुंबीयांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी असल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले. येथे उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाबाबतही त्यांनी माहिती दिली. शॉर्ट फिल्मच्या निर्मितीबद्दल त्यांनी कौतुक केले. -------------- १६-१ चौकट काय होता नेमका लढा इंग्रजांच्या काळात अनेक बंधने आणि निर्बंध असतानाही स्वातंत्र्य चळवळीतील जखमी सैनिकाला मदत करण्याचे धाडसी कार्य स्व.पाटोळे यांनी केले होते. त्यांच्या या धाडसाची आणि राष्ट्रनिष्ठेची दखल क्रांतिसिंह नाना पाटील यांनी घेतली होती. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी येवला येथे शिवजयंती उत्सव सुरू करण्याची सूचना दिली. त्याकाळात अनेक बंधने असल्याने शिवजयंती उत्सवासाठी आवश्यक परवानगी मिळविण्यासाठी लढा उभारण्यात आला आणि हायकोर्टापर्यंत संघर्ष करून परवानगी मिळविण्यात आली. त्या संघर्षातून सुरू झालेला हा शिवजयंती उत्सव आज ९१ वर्षांनंतरही त्याच उत्साहाने आणि अभिमानाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com