फोटो ओळ : 26693
अंदरसूल : थायबॉक्सिंग व किकबॉक्सिंगमध्ये जिल्हास्तरावर यश मिळवणारे मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी व शिक्षक.
सोनवणे विद्यालयाचे
थायबॉक्सिंगमध्ये यश
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. १३ : जिल्हास्तरीय शालेय थायबॉक्सिंग व किकबॉक्सिंग स्पर्धेत अंदरसूलच्या मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
थायबॉक्सिंगमध्ये महिला गटात जयश्री देशमुख व श्रेया शिंदे, तर पुरुष गटात कार्तिक निलक, असीम पठाण व ओम वाघ प्रथम आले. महिला गटात श्रुती शिंदे, वेदश्री वडनेरे, तर पुरुष गटात आदित्य मोरे, साईराज सोनवणे व फहद शाह द्वितीय क्रमांक मिळवला.
किकबॉक्सिंगमध्ये फहद शाह याने प्रथम क्रमांक मिळवला. ओम वाघ व आदित्य मोरे द्वितीय, तर
राजवीर सोनवणे, उत्कर्ष वाघ व ओम वाघ यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांना प्रशिक्षक राजेश कांबळे व साक्षी देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, सहचिटणीस मयूर सोनवणे, राजेंद्र गायकवाड व प्राचार्य अल्ताफ खान यांनी अभिनंदन केले.
.........