YEO26B26717
येवला ः गणरायाच्या आगमनाप्रसंगी वेशभूषा करून शहरातून लेझीम सादर करताना मुक्तांनंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी.
--------------
‘मुक्तानंद’च्या पथकाने
वेधले नागरिकांचे लक्ष
---------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१४ : येथील श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त श्री गणरायाचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने शहरातून झांज अन लेझिमचे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांनी येवलेकरांचे लक्ष वेधले.
शहरातील विविध प्रमुख भागांतून गणरायाच्या आकर्षक मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट झांजपथक आणि लेझिम पथकाने आपल्या बहारदार प्रात्यक्षिकांनी सर्व येवलेकरांची वाहवा मिळवली. या लेझिम पथकाचे नियोजन जी. जी. सोनवणे, गणेश हारके, श्रीमती पैंजणे, भक्तराज मुंडे आणि मनोज पोरजे यांनी केले.
विद्यालयात संस्थेचे उपाध्यक्ष श्री. व सौ. सचिन एंडाईत यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. या काळात विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात येऊन आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमृत पहिलवान, सचिव डॉ. किरण पहिलवान, सहसचिव संजय नागडेकर, खजिनदार तेजस गायकवाड, संचालक राजेंद्र खानापुरे, डॉ. अमोल पहिलवान, दत्तात्रय नागडेकर, अमोल एंडाईत, प्राचार्य राजेंद्र सोनवणे, उपप्राचार्य अंबादास ढोले, पर्यवेक्षक दत्तात्रय साताळकर, सुनील देवरे, माया हादगे आदी उपस्थित होते.
-------------------