येवला महाविद्यालयात अभियंता दिनी महावितरणच्या अभियंत्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

येवला महाविद्यालयात अभियंता दिनी महावितरणच्या अभियंत्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद
Published on
पान तीन 26730 येवला : महावितरणच्या योजना व सुरक्षा विषयक माहिती पत्रकासमवेत अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी. येवला महाविद्यालयात अभियंत्यांचा संवाद येवला, ता. १५ : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मंगळवारी (ता.१५) भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय अभियंता दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना अभियंत्यांचे देशाच्या विकासातील योगदान, वीज बचत तसेच विद्युत उपकरणांच्या सुरक्षित वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महावितरणचे येथील उपकार्यकारी अभियंता आर. एम. पाटील व साहाय्यक अभियंता एस. एस. सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते. यावेळी आर. एम. पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभियंत्यांचे विविध क्षेत्रांतील योगदान, ऊर्जा बचतीचे महत्त्व आणि विद्युत सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती दिली.वीज उपकरणे हाताळताना दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक प्रा. पी. वाय. देवरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नीलेश नाईक यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. धनंजय पेहेरकर यांनी करून दिला, तर आभार प्रा. सुरेखा राजवाळ यांनी मानले. महावितरणचे श्री. सोनवणे, श्री. चव्हाण, श्री. चौधरी, श्री. साळी, श्री. खळे, श्री. आवारे यांच्यासह कार्यालयीन अधीक्षक भालचंद्र पेंढारकर, प्रा. धनंजय पेहेरकर, डॉ. नीलेश नाईक, प्रा. रामदास चव्हाण, प्रा. सुरेखा राजवाळ, प्रा. शंकर शिंदे, प्रा. पी. वाय. देवरे, प्रल्हाद जाधव, सोमनाथ कुवर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com