पीक पाहणीच्या प्रक्रियेला आता डिजिटल गती..!

पीक पाहणीच्या प्रक्रियेला आता डिजिटल गती..!
Published on
पान तीन ------------------- मोबाईलवरूनच करता येणार पीक नोंदणी! ‘डीसीएस एमएच’ॲपद्वारे शेतकऱ्यांसाठी सुविधा सुरू सकाळ वृत्तसेवा येवला, ता. १६ : पीक पाहणीच्या प्रक्रियेला आता डिजिटल गती मिळणार असून, शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांची नोंदणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही. केंद्र शासनाच्या ‘डीसीएस एमएच’ मोबाईल ॲपद्वारे शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून शेतातील पिकांची नोंदणी करू शकणार आहेत. शेतकरी स्तरावरून पीक नोंदणीची ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. पीक पाहणी अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक व्हावी, तसेच शेतकऱ्यांना ही प्रक्रिया घरबसल्या करता यावी, या उद्देशाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी या ॲपद्वारे सहाय्यक स्तरावर पीक नोंदणी केली जात होती; मात्र आता शेतकऱ्यांनाही थेट आपल्या स्तरावरून ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. पीक नोंदणी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शेतात प्रत्यक्ष लागवड केलेल्या पिकांचीच अचूक आणि पूर्ण माहिती नोंदवावी. या पीक नोंदणीतून संकलित होणाऱ्या माहितीच्या आधारे राज्यातील विविध पिकांचे क्षेत्र, लागवडीची स्थिती आणि पिकांची आकडेवारी शासनाला अधिक अचूकपणे उपलब्ध होणार आहे. अशी करा नोंदणी मोबाईलमध्ये ‘डीसीएस एमएच’ ॲप डाऊनलोड करावे. आपला शेतकरी ओळख क्रमांक प्रविष्ट करावा. फार्मर आयडीशी संलग्न शेतजमिनी तपासाव्यात. शेतात प्रत्यक्ष घेतलेल्या पिकांची अचूक नोंद करावी. -------------- शेतकऱ्यांच्या सोयीसाठी मोबाईलवरून थेट पीक नोंदणीची सुविधा उपलब्ध झाली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेत आपल्या शेतातील पिकांची अचूक व वेळेत नोंदणी करून घ्यावी. - आबा महाजन (तहसीलदार, येवला)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com