नमो उद्यानाची स्वच्छता,१४० औषधी वनस्पतींचीही लागवड!

नमो उद्यानाची स्वच्छता,१४० औषधी वनस्पतींचीही लागवड!
Published on
YEO26B26751 येवला : नमो उद्यान मध्ये वृक्षारोपण करताना नगरपालिकेचे पदाधिकारी व अधिकारी. --------------- नमो उद्यानाची स्वच्छता, औषधी वनस्पतींची लागवड नगरपालिकेकडून स्वच्छता, हरित संवर्धनातून येवला शहराला नवी झळाळी ------------ सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१७ : स्वच्छ शहरासोबतच हरित आणि निरोगी शहराची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नगरपरिषदेने स्वच्छता ही सेवा पंधरवड्यानिमित्त स्वच्छता व वृक्षारोपणाचा संदेश देणारे उपक्रम राबविले. नमो उद्यान गार्डनमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नक्षत्र गार्डनमध्ये विविध प्रजातींच्या २७ वृक्षांची लागवड करण्यात आली. नमो उद्यान परिसरात १४० औषधी वनस्पतींचीही लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. नमो उद्यान गार्डन येथे नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून उद्यान परिसर कचरामुक्त केला. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता ही नागरिकांचीही जबाबदारी असल्याचा संदेश देण्यात आला. नक्षत्र गार्डनमध्ये विविध प्रजातींच्या २७ वृक्षांची लागवड करण्यात आली. शहरातील हिरवाई वाढविणे, पर्यावरणाचा समतोल राखणे, प्रदूषण कमी करण्यास हातभार लावणे आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी वातावरण निर्माण करणे हा वृक्षारोपणाचा उद्देश आहे. नक्षत्र गार्डनमधील वृक्षारोपणासाठी डॉ. महेश्वर तगारे यांचे सहकार्य लाभले. नमो उद्यान गार्डन येथे १४० औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. या माध्यमातून जैवविविधता, वनस्पती संवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुख्याधिकारी तुषार आहेर, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, गटनेते दीपक लोणारी, स्वच्छता सभापती पारुल गुजराथी, बांधकाम सभापती शंकर मांजरे, नगरसेवक प्रवीण बनकर, प्रशांत शिंदे, बांधकाम अभियंता गणेश अंदुरे, स्वच्छता निरीक्षक प्रतीक उंबरे, स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे, नितीन आहेर, प्रकल्प अधिकारी संदीप बोढरे, वृषाली अहिरे, प्रभाकर वाघ, राहुल जाधव, विशाल लोणारी आदी उपस्थित होते. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com