३६-२
एसएनडी फॉर्मसीच्या सहा
जणांची विभागावर निवड
पोस्टर स्पर्धेत ९२ विद्यार्थ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१७ : बाभूळगाव येथील एस.एन.डी. कॉलेज ऑफ फार्मसी येथे विद्यार्थ्यांनी विविध संशोधन संकल्पना पोस्टरच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर केल्या. यातून सहा विद्यार्थ्यांची विभागास्तरावर निवड झाली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने झालेल्या आविष्कार संशोधन स्पर्धेत डी. फार्म., बी. फार्म. आणि फार्म. डी. अभ्यासक्रमातील तब्बल ९२ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या स्पर्धेतून पदवीपूर्व व पदव्युत्तर गटातील प्रत्येकी तीन अशा सहा विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, चिकित्सक विचारसरणी आणि समस्या सोडविण्याच्या क्षमतेचे दर्शन घडविण्याची संधी मिळाली. प्राचार्य प्रा. डॉ. अमोल गायके यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रा. डॉ. भास्कर आहेर व प्रा. डॉ. सचिन आगलावे यांनी परीक्षण केले. शैक्षणिक विभाग प्रमुख प्रा. विकास शिंदे तसेच शैक्षणिक संशोधन समन्वयक प्रा. रामदास दराडे, आविष्कार समन्वयक प्रा. सयाली पागिरे, प्रा. मनोज गरड व प्रा. महेंद्र वरपे यांनी नियोजन व समन्वय केले. विजेत्या विद्यार्थ्यांसह सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाबद्दल प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देतानाच नावीन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ देणाऱ्या या उपक्रमामुळे महाविद्यालयात संशोधन संस्कृती व नवोपक्रमाची वृत्ती रुजण्यास हातभार लागल्याचे प्राचार्य डॉ.गायके यांनी सांगितले.
---------------