विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार चंद्रकांत हंडोरे : येवल्यातील मेळाव्यात महेंद्र पगारेचा समर्थकांसह भीमशक्तीत प्रवेश

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार  चंद्रकांत हंडोरे : येवल्यातील मेळाव्यात महेंद्र पगारेचा समर्थकांसह भीमशक्तीत प्रवेश
Published on
YEO26B26763 येवला : स्वारीपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे यांचा भीमशक्तीत प्रवेश करून घेताना माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे.समवेत पदाधिकारी व कार्यकर्ते. ------------ चुकीच्या धोरणांमुळेच विद्यार्थ्यांचे आंदोलन चंद्रकांत हंडोरे : येवल्यात महेंद्र पगारेंचा समर्थकांसह भीमशक्तीत प्रवेश ----------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१८ : राज्यात विद्यार्थ्यांची आंदोलने पेटत असताना त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सरकार राजकारणात मश्गूल आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच विद्यार्थ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असून, नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण, पुण्यातील पीएच.डी. विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि आंबेडकरी वसतिगृहांची दुरवस्था यासाठी सरकारच जबाबदार आहे, असा घणाघाती आरोप भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी येथे केला. येथे भीमशक्ती संघटनेतर्फे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भीमशक्तीचे कार्याध्यक्ष अशोक दिवे होते. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून मेळाव्यास सुरुवात झाली. स्वारिपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांसह भीमशक्ती संघटनेत जाहीर प्रवेश केला. श्री. पगारे यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत खासदार हंडोरे यांनी त्यांची भीमशक्तीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर केली. खासदार हंडोरे म्हणाले, महेंद्र पगारे हे ग्रामीण भागातील नेतृत्व असून फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारातून घडलेले आहेत. त्यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. त्यांच्या प्रवेशामुळे भीमशक्ती संघटनेला निश्चितच बळ मिळेल. अशोक दिवे यांनी पगारे यांच्यासारखे तरुण, तडफदार नेतृत्व भीमशक्तीमध्ये आल्याने संघटनेला नवी ऊर्जा मिळेल असे सांगितले. भीमशक्तीचे शशिकांत बनसोडे, एन. के. कांबळे, भाऊसाहेब साठे, राजाभाऊ गांगुर्डे, शिमोन जगताप, चंद्रकांत कर्डक, प्रेम चव्हाण, संदीप मगर, राहुल केदारे, गौतम पगारे आदींनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, विजय घोडेराव, बाळासाहेब आहिरे, विनोद त्रिभुवन, अजहर शेख, नयना सोनवणे, ज्योती पगारे, रेश्मा आहिरे, सविता आहिरे, अलका घोडेराव, लक्ष्मी त्रिभुवन, सविता पवार आदी उपस्थित होते. ---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com