पान-३ ॲंकर चालेल
YEO26B26765
येवला : शिवसेनेच्या बैठकीत बोलताना जिल्हाप्रमुख कारभारी आहेर.सोबत उपस्थित पदाधिकारी.
--------------------------
जनतेच्या न्यायहक्कासाठी रस्त्यावर उतरा
कारभारी आहेर : येवल्यात शिवसेनेच्या कार्यालयात पदाधिकारी बैठकीत आवाहन
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१९ : शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि मजुरांच्या प्रश्नांनी जनजीवन संकटात सापडले असताना त्यांच्या व्यथा शासनदरबारी पोहोचविण्यासाठी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभे करावे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित दिंडोरी लोकसभा प्रमुख कारभारी आहेर यांनी केले.
येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पदाधिकारींच्या बैठकीत ते बोलत होते. उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, सर्जेराव सावंत, छगन आहेर आदी उपस्थित होते. ते म्हणाले, महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असताना सरकार जनतेच्या प्रश्नांकडे कानाडोळा करीत आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि मजूर विविध संकटांना सामोरे जात आहेत. मात्र, सरकार जनतेच्या मूलभूत प्रश्नांऐवजी जाती-जातींत संघर्ष निर्माण करण्याच्या राजकारणात व्यस्त आहे. जनता मेटाकुटीला आली असून, जनतेमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघटित होऊन त्यांच्या न्याय आणि हक्कासाठी संघर्ष करावा, असे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ शिवसैनिक वाल्मीक गोरे, उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, सर्जेराव सावंत, छगन आहेर यांनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीस रावसाहेब नागरे, गणेश वडनेरे, श्याम व्यापारे, युवा सेना तालुका अधिकारी संतोष गोरे, संजय सालमुठे, भरत बोंबले, जनार्दन भवर, विठ्ठल महाले, राजेंद्र सानप, रमेश फरताळे, विशाल घोडेस्वार, अनंता आहेर, ज्ञानेश्वर शिर्के, राकेश व्यापारे, सुखदेव भोरकडे, दत्तू खोकले आदी उपस्थित होते. नितीन संसारे यांनी आभार मानले.
-----------------