YEO26B267६८
येवला : भाजपाच्या रक्तदान शिबिराप्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते.
-------
३०-२
पंतप्रधानांच्या वाढदिवशी
१६४ दात्यांकडून रक्तदान
--------------
भाजपकडून सामाजिक बांधिलकीचा संदेश
--------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. १८ : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियानाअंतर्गत भाजपतर्फे झालेल्या शिबिरात १६४ रक्तदात्यांनी ऐच्छिक रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास नाव व छायाचित्र असलेले छापील प्रमाणपत्र तसेच ‘आशीर्वादचा दिवा’ या उपक्रमांतर्गत पणती देऊन गौरविण्यात आले.
मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात शिबिराचे आयोजन करण्यात आले. भाजपचे नाशिक उत्तर जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे यांच्या पुढाकाराने झालेल्या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक दिनेश मुंदडा यांच्या हस्ते झाले.
प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, बँकेचे माजी अध्यक्ष विकर्णसिंह परदेशी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, ओबीसी आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक सचिन दराडे, येवला विधानसभा प्रमुख अमृता पवार, श्रावण जावळे, संतोष काटे, मुकुंद गंगापूरकर, देविदास भांबरे, ॲड. शैलेश भावसार, राहुल लोणारी, उपनगराध्यक्षा पुष्पा गायकवाड, नगरसेविका लक्ष्मी साबळे, छाया क्षीरसागर, बंडू क्षीरसागर, मयूर मेघराज, धीरजसिंह परदेशी आदीनी उपस्थिती लावली. आनंद शिंदे यांनी प्रास्ताविकातून अभियानाची माहिती दिली. सुभाष पाटोळे व दत्तात्रय महाले यांनी मार्गदर्शन केले. भाजप युवा नेते सर्वेश मेहेंदळे यांनी विशेष भेट दिली. जनकल्याण रक्तकेंद्र यांच्या पथकाने शिबिरात रक्तसंकलन केले.
-------------------