पान--१- हाफ फोटो अंबादास बनकर यांचा घेणे
--------------
३६-३
जनता सहकारी बँकेचा एनपीए शून्य टक्के
---------
६६ लाखांचा निव्वळ नफा, अध्यक्ष अंबादास बनकर यांची माहिती
------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. १८ : ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देत विविध आव्हानांवर मात करून येथील जनता सहकारी बँक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बँकेला ‘अ’ वर्ग प्राप्त झाला असून नेट एनपीए शून्य टक्के राहिला तर ६६ लाखांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष अंबादास बनकर यांनी दिली.
बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. सभेच्या प्रारंभी श्री. बनकर, उपाध्यक्ष ओंकारेश्वर कलंत्री, संचालक मंडळ तसेच ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित गुंजाळ यांनी अहवाल वाचन केले.
श्री. बनकर म्हणाले, संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाच्या प्रयत्नांतून बँकेला ‘अ’ वर्ग मिळाला असून नेट एनपीए शून्य टक्के आहे. रिझर्व्ह बँकेच्या सूचक मार्गदर्शक तत्त्वांनुसार बँक निकषास पात्र असून बँकेची आर्थिक स्थिती मजबूत आहे. बँकेच्या एकूण ठेवी ८३ कोटी रुपये असून कर्जवाटप ५२ कोटी रुपये झाले आहे. बँकेची गुंतवणूक ३९ कोटी रुपये, तर राखीव व इतर निधी ११ कोटी ४२ लाख रुपये आहे. ३१ मार्च २०२६ अखेर बँकेचा ढोबळ नफा १ कोटी ७२ लाख रुपये असून तरतुदी वजा जाता निव्वळ नफा ६६ लाख ८१ हजार रुपये झाला आहे. सभासद-कर्जदारांनी कर्जाचे हप्ते व व्याज वेळेत भरून बँकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. सभेत विविध विषयांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. बँकेच्या पारदर्शक कारभाराबद्दल सभासदांनी समाधान व्यक्त केले.
सभे, सर्व संचालक तसेच ज्येष्ठ सभासद रामेश्वर कलंत्री, रामेश्वर अट्टल, आशुतोष पटेल, माणिकराव वाघ, मधुकर शिंदे, सोपान सातपुते, कारभारी त्रिभुवन आदी उपस्थित होते. बँकेचे संजय साताळकर,राजेंद्र वाबळे, रविंद्र जाधव,संजय बोराडे,भानुदास जाधव, अनिल वडनेरकर, पांडुरंग पवार, संदीप गायकवाड, अनिल गायकवाड आदी कर्मचाऱ्यांनी नियोजन केले.
-----------------