सामाजिक,धार्मिक सजावटीतून गौराईच्या समोर उमटला कलाविष्कार!

सामाजिक,धार्मिक सजावटीतून गौराईच्या समोर उमटला कलाविष्कार!
Published on
YEO26B26775 येवला : कुणाल दराडे फाउंडेशनच्या गौराई सजावट स्पर्धेत सजावटीची पाहणी करताना कुणाल दराडे तसेच परीक्षक. ३६-२ गौराई सजावट स्पर्धेमध्ये सत्तरवर महिला सहभागी कुणाल दराडे फाउंडेशनतर्फे उपक्रम उत्साहात सकाळ वृत्तसेवा येवला, ता.२१ : येथील कुणाल दराडे फाउंडेशनतर्फे झालेल्या गौराई सजावट स्पर्धमध्ये ७० हून अधिक कुटुंबांनी सहभाग नोंदवत महिलांच्या कल्पकतेचा आणि कलागुणांचा अनोखा आविष्कार घडविला. फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसह परीक्षकांनी या सर्व देखाव्यांचे पाहणी करून परीक्षण केले. सांस्कृतिक व उत्सवप्रिय शहराला गौरी गणपतीची (महालक्ष्मी) मोठी परंपरा आहे. यानिमित्त झालेल्या सजावट स्पर्धेत शहरातील महिलांनी उस्फूर्त सहभाग घेत कल्पकतेतून अतिशय मेहनतीने सुंदर व नेत्रदीपक देखावे साकारले. स्पर्धेचे हे सलग सहावे वर्ष आहे. युवा नेते कुणाल दराडे आणि डॉ. कविता दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी हा उपक्रम होतो. नोकरी करणाऱ्या तसेच गृहिणी महिलांना आपल्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने सुरू झालेल्या या स्पर्धेला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध सामाजिक संदेश देत महिलांनी अप्रतिम देखावे साकारले. विशेषतः श्री केदारनाथ धाम आणि काशी विश्वनाथ वाराणसी गंगा घाट’ हा देखावा विशेष आकर्षण ठरला. श्रीकृष्ण रासलीला, दहीहंडी, छप्पन भोग आणि द्रौपदी वस्त्रहरण या प्रसंगांचा सुरेख संगम महालक्ष्मीच्या रूपात महिलांनी साकारला. ‘खंडेराव-बानू विवाह’ प्रसंगाची भक्तिमय मांडणीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्याबरोबरच कुटुंबातील सदस्यांच्या कल्पक सहभागाला चालना मिळत आहे. पारंपरिक भक्तिभावाला कल्पकता आणि सामाजिक जाणीवेची जोड देणारा हा उपक्रम येवलेकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्याचे डॉ. कविता दराडे यांनी सांगितले. संगीता पटेल, अदिती पटेल, ज्योती खंदारे, शीतल कोळस, काजल कुक्कर तसेच फाउंडेशनचे विजय गोसावी, राहुल भावसार, आत्मेश विखे, सुनील काटवे, मकरंद तक्ते, मोहफीज अत्तर, सिद्धेश धिवर, ऋषीं मेंगाणे आदींनी पाहणी करत परीक्षण केले. ---------------- कोट महिलांच्या कलेला हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने फाउंडेशन नेहमी कार्यरत असते. यंदा महिलांनी स्वतः संशोधन करून, कल्पकता वापरून अनेक सुंदर व कलात्मक देखावे केले. येवल्याच्या उत्सवप्रियतेला आणि महिलांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी भविष्यातही असे उपक्रम सुरूच राहतील. - कुणाल दराडे, संस्थापक, कुणाल दराडे फाउंडेशन ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com