सजीव धार्मिक,पौराणिक देखाव्यानी भक्तिमय वातावरण..!

सजीव धार्मिक,पौराणिक देखाव्यानी भक्तिमय वातावरण..!
Published on
पान-३ साठी --------------- फोटो YEO26B26818 ओमकार धर्म रक्षक ग्रुप, रेणुका माता. --------------- YEO26B26816 मधल्या गल्लीतील गजानन मित्र मंडळ, श्री येडेश्वरी माता मंदिर. -------- YEO26B26814 काटे मारुती तालीम संघ, बालाजी मंदिर प्रतिकृती. ----------- YEO26B26810 राम अंजने स्वामी प्रतिष्ठान, गरुड पुराणातील प्रसंग. ----- YEO26B26808 कुक्कर गल्लीतील ल.ब.क फ्रेंड सर्कल, गुरुशिष्य भेट. ---------- YEO26B26804 क्षत्रिय ग्रुप, बालेश्वरी मंदिर. श्री महालक्ष्मी माता. ----- YEO26B26802 धोबी गल्लीतील जय भवानी मित्र मंडळ, लाडकी लेक वाचवाचा संदेश. ---------- YEO26B26799 येवला ः शिवशंभू वॉरिअर्स मित्र मंडळ, तिरुपती बालाजी. ------------ YEO26B26794 येवला : भोई गल्लीतील एसएम ग्रुप, वैष्णोदेवी माता मंदिर. ---------- YEO26B26797 येवला : साळी गल्लीतील राजा मित्र मंडळ, ------ YEO26B26792 येवला : बालाजी गल्लीतील बालाजी मित्र मंडळ. तिरुपती बालाजी रूपातील गणेशमूर्ती ------------ YEO26B26790 येवला : रामराजे मित्र मंडळ, बालाजी गल्ली. ------------ YEO26B26788 येवला : अरिहंत ग्रुप. ----------- YEO26B26786 येवला : गंगा दरवाजा मित्र मंडळ, सिंहासनारूढ गणेश. ------------- YEO26B26784 येवला ः १३८ वर्षाची प्रथम मानाची परंपरा असलेल्या (कै) धोंडिराम वस्ताद तालीम संघाची कृष्ण राधा रूपातील आकर्षक गणेशमूर्ती (छायाचित्र ः सचिन वखारे) --------------------- ३६-४ देखाव्यांतून फुलला भक्तीचा मळा! --------- येवल्यात २० हून अधिक मनोहारी देखावे पाहण्यासाठी भाविकांची रात्रीपर्यंत गर्दी ------------ सकाळ वृत्तसेवा येवला, ता.२१ : उत्सवप्रिय येवल्याच्या गणेशोत्सवाला यंदा सजीव धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक देखाव्यांची अनोखी रंगत लाभली आहे. वर्षानुवर्षांची देखाव्यांची समृद्ध परंपरा नव्या पिढीनेही जपत यंदा शहरातील विविध गणेश मंडळांनी तब्बल २० हून अधिक आकर्षक देखावे साकारले आहेत. हलत्या आणि सजीव देखाव्यांतून साकारलेली धार्मिक व पौराणिक दृश्ये भाविकांचे लक्ष वेधून घेत असून हे देखावे पाहण्यासाठी रात्री येवल्यातील गल्ल्या भाविकांच्या गर्दीने फुलून जात आहेत. ------------- येथील गणेशोत्सवाची अनेक वर्षांपासून उत्सवप्रियता जपत ऐतिहासिक, पौराणिक आणि काल्पनिक विषयांवरील हलते व सजीव देखावे सादर केले जातात. हलत्या देखाव्यापेक्षा सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे प्रसंग जिवंत देखाव्याच्या माध्यमातून मांडले आहेत. देखावे खुले होऊन दोन दिवस झाले असून सायंकाळच्या वेळेस नागरिक देखावे पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. अनेकजण कुटुंबीयांसह रात्री उशिरापर्यंत देखावे पाहत आहेत. काही मंडळांनी अतिशय देखण्या मूर्ती आहेत. त्या पाहण्यासाठी गर्दी होत आहे, विशेषता काटे मारुती तालीम संघाची मूर्ती शहराचे लक्ष वेधत आहे. भाविकांच्या गर्दीने रात्री रस्ते गर्दीने फुलत आहे. नागरिकांना आकर्षित करण्यासाठी नेत्रदीपक रोषणाई, मनमोहक सजावट करण्यात आली आहे. ठिकठिकाणी देशातील प्रसिद्ध मंदिरांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. तिरुपती बालाजीचा देखावा लक्ष वेधून घेत आहे. शिवशंभो वारियर्स मित्र मंडळातर्फे श्री तिरुपती बालाजींचा देखावा, एस. एम. ग्रुप भुईगल्ली येथे वैष्णोदेवी माता मंदिराचा देखावा, जय भवानी मित्र मंडळातर्फे ‘लाडकी लेक’ या सामाजिक विषयावरील देखावा, क्षत्रिय ग्रुपतर्फे ३५ फूट उंच कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराचा देखावा, ल.ब.क. फ्रेंड सर्कलतर्फे ‘गुरुशिष्य भेट, कानिफनाथ नाथ शक्ती’चा जिवंत देखावा, श्री राम अंजनेय स्वामी प्रतिष्ठानतर्फे ‘गरुड पुराण’ विषयावरील प्रबोधनात्मक देखावा, श्री काटे मारुती तालीम संघातर्फे बालाजी मंदिराचा देखावा, गजानन मित्र मंडळातर्फे धाराशिवच्या श्री येडेश्वरी माता मंदिराचा हुबेहूब देखावा, तर ओमकार धर्म रक्षक ग्रुपतर्फे माहूरगडच्या श्री रेणुका माता मंदिराचा नयनरम्य देखावा साकारण्यात आला आहे. -------------------------- असे आहेत देखावे... -बुंदेलपुरा तालीम संघ – पावनखिंड -लक्ष्मीनारायण मित्र मंडळ (तीन देऊळ) – अष्टविनायक दर्शन - त्रिमूर्ती फ्रेंड सर्कल (पहाड गल्ली) – भूत बंगला देखावा - मोदकेश्वर मित्र मंडळ (कुंडीचा हाऊद) – छत्रपती शिवाजी महाराज सजीव देखावा - शिवशक्ती मित्र मंडळ (लोणार गल्ली) – सजीव देखावा - कासार युवा प्रतिष्ठान (कासार गल्ली) – औंढा नागनाथ देखावा - शितला माता दक्षिण मुखी हनुमान मित्र मंडळ (कुंभारगल्ली) – गुप्तेश्वर महादेव नेपाळ देखावा - पहिलवान गल्लीचा राजा – पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर देखावा - सावजी गृप (जोगवाडा) – बारा जोर्तिलिंग देखाव - तिरंगा गृप (खंडेराव मंदिर – एकवीरा आई देखावा ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com