YEO26B26826
अंगणगाव : विसर्जन होणाऱ्या घाटाची पाहणी करताना आमदार पंकज भुजबळ समवेत मुख्याधिकारी तुषार आहेर,बाळासाहेब लोखंडे आदी.
--------------
गणेश विसर्जनासाठी पुरेशा
सुविधा उपलब्ध कराव्यात
पंकज भुजबळ : अंगणगाव घाट, बोटक्लबची पाहणी
---------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.२१ : भाविकांना विसर्जनासाठी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या विविध विभागांनी समन्वयाने काम करावे. विसर्जन सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडण्यासाठी घाट परिसरातील स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, सुरक्षिततेच्या उपाययोजना, गर्दीचे नियोजन तसेच आवश्यक सुविधा करण्यात याव्यात असे निर्देश आमदार पंकज भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंगणगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट तसेच बोटिंग क्लब परिसराची भुजबळ यांनी प्रत्यक्ष पाहणी करून विसर्जन सोहळ्याच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या प्रशासकीय तयारीचा सविस्तर आढावा घेतला. मुख्याधिकारी तुषार आहेर, मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे उपस्थित होते. विसर्जनप्रसंगी
महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दिव्यांग भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. अहिल्यादेवी होळकर घाट, बोटिंग क्लब परिसरातील स्वच्छता, सुरक्षितता, प्रकाश व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. प्रशासनाने कोणत्याही प्रकारची हलगर्जी न करता नियोजनबद्ध पद्धतीने काम करून विसर्जन सोहळा शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी पूर्णपणे सज्ज राहावे, असे आमदार पंकज भुजबळ यांनी सांगितले.
-----------------