राधा-वल्लभ मूर्तीची चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक

राधा-वल्लभ मूर्तीची चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक
Published on
YEO26B26836 येवला : राधा अष्टमीनिमित्त येथे गुजराथी समाजाच्या मिरवणुकीत सहभागी समाजबांधव. --------------- राधा- वल्लभांच्या मूर्तीची चांदीच्या रथातून मिरवणूक गुजराती बांधवांकडून येवल्यात राधा अष्टमी ​सकाळ वृत्तसेवा येवला, ता.२१ : राधा अष्टमीनिमित्त येथे गुजराथी समाजातर्फे श्री राधा-वल्लभ यांच्या मूर्तीची चांदीच्या पालखीतून शहरातून अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांचा गजर, मंदिर परिसराला आकर्षक रोषणाई आणि फुलांची उधळण करत निघालेल्या या शोभायात्रेत गुजराती समाजातील महिला, पुरुष आणि तरुण सहभागी झाले होते. शहरात श्री राधाकृष्ण देवतेची सुमारे ८७ वर्षांची परंपरा जपत श्री. राधावल्लभ पालखी मिरवणूक काढण्यात आली. टिळक मैदानावरील मंदिरात हा उत्सव साजरा करण्यात आला. गुजराथमधून सुमारे ३८७ वर्षांपूर्वी लेवा पाटीदार समाज येवल्यात स्थायिक झाला. शेती हा प्रमुख व्यवसाय असलेला हा समाज राधाकृष्ण भक्तीची परंपरा जपणारा असून, दरवर्षी राधा अष्टमीचा उत्सव साजरा करतात. शेठ गंगाराम छबिलदास परिवाराने साकारलेल्या मंदिरातून श्री राधावल्लभांची पालखी मिरवणूक काढण्याची परंपरा सुरू झाली. या मंदिरातील पालखी मिरवणुकीचे हे ८७ वे वर्ष असून, ही परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी चौघडा, घोड्याचा रथ, येवल्याचे प्रसिद्ध वाद्यवृंद आणि विविध प्रकारचे ध्वज होते. रेशमी पितांबर तसेच पाठीवर भरजरी विणकाम केलेले रुमाल धारण केलेल्या युवकांनी श्री राधावल्लभांची चांदीची पालखी खांद्यावर घेतली होती. मिरवणूक मंदिरात पोहोचल्यानंतर श्री राधाकृष्ण मूर्तीची विधिवत पूजा अर्चना करण्यात आली. राधा अष्टमी उत्सवानिमित्त समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. पालखी मिरवणुकीत लेवा पाटीदार गुजराथी समाज अध्यक्ष, सरपंच मनोज पटेल, उपसरपंच निखिल पटेल, खजिनदार हितेश पटेल, विश्वस्त सुबोध पटेल, विकास पटेल, सुशील गुजराथी, यतीन पटेल, यतीन गुजराथी आदींसह महिला मंडळाच्या उपाध्यक्षा तोरल पटेल, पारुल गुजराथी, शीलाबेन पटेल, श्वेता पटेल, लक्ष्मी पटेल, योगिता पटेल, सुचिता पटेल, नलश्री गुजराथी, निकिता पटेल, शैला गुजराथी आदी उपस्थित होते. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com