Illegal Mining Case
sakal
नाशिक: टोकडे येथील पाझर तलावाच्या बुडीत क्षेत्रातील अवैध गौण खनिज साठवणूक व भराव केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दादाजी नारायण शेजवळ यांना ३० लाख ७२ हजारांचा दंड मालेगावच्या तहसीलदारांनी ठोठावला आहे. येत्या आठ दिवसांत या दंडाची रक्कम शासन जमा करावी, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा या नोटिसीद्वारे देण्यात आला.