येवला : टोलवसुली जोमात सुरू असताना मालेगाव-मनमाड- कोपरगाव महामार्गावर ठिकठिकाणी डांबराचे उंचवटे तयार होऊन अपघात होत आहेत. साइडपट्ट्यांची वाट लागली. या संदर्भात ‘सकाळ’ने लक्ष वेधताच टोल प्रशासनाला जाग आली असून, सोमवारी (ता. १७) जेसीबीने हे डांबराचे उंचवटे काढण्याचे काम हाती घेतले आहे. ही केवळ मलमपट्टी आहे. खराब झालेल्या पूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करावे; अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी सभापती संभाजी पवार यांनी दिला.