पांढुर्ली येथील बाजार समितीच्या मार्केटमध्ये टमाट्याच्या भावात घसरण

पांढुर्ली येथील बाजार समितीच्या मार्केटमध्ये टमाट्याच्या भावात घसरण
Published on: 
फोटो सिंगल PNH26B07569 पांढुर्ली ः विक्रीसाठी काढून ठेवलेला टोमॅटो. -------------------- पांढुर्ली उपबाजार आवारात टोमॅटोच्या भावात घसरण --------------- सकाळ वृत्तसेवा पांढुर्ली, ता.१७ ः सिन्नर बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजारात शनिवारी (ता.१७) टोमॅटोचे भाव प्रती कँरेटला शंभर ते एकशे वीस रूपयांपर्यत खाली आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उत्पादन खर्च भरून निघत नसल्याने ऐन दुष्काळी परिस्थितीत आर्थिक संकट निर्माण झाले आहे. ------------- शिवडे, पांढुर्ली व पंचक्रोशीतील टोमॅटो उत्पादक शेतकरी ढासळलेल्या बाजारभावामुळे कमालीचे हैराण झाले आहे. वाढत्या तापमानामुळे टोमॅटो उत्पादक अडचणीत आले आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा खते, बियाणे, रोपे, औषधे, मजुरी या भांडवलात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्या तुलनेत टोमॅटोला दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पांढुर्ली येथे टोमॅटो लिलाव सुरु झाले आहे, सुरवातीला चांगले दर मिळाल्याने आवक वाढली. मात्र नंतर शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. येथे शिवडे, पांढुर्ली, विंचूर दळवी, शेणित, बेलू, आगसखिंड, सावतामाळीनगर, घोरवड, भरवीर येथील शेतकरी टोमॅटो विक्रीस आणत आहे. एक क्रेट टोमॅटो तोडण्यासाठी ३० रुपये प्रती क्रेट व भाडे २० रुपये, हमाली २ रुपये प्रति क्रेट असा ५२ रुपये खर्च येत आहे. बाजारभाव १०० त १२० रुपये मिळत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. दुष्काळ असल्याने पुढील हंगामात पिके येणार नाही, त्यामुळे सरकारने लवकर लवकरात याची दखल घ्यावी व मदत करावी अशी मागणी शेतकरी उत्तमराव हारक यांनी केली आहे. -------------
Marathi News Esakal
www.esakal.com