Nashik: ‘गोदावरी एक्स्प्रेस’ सुरु न झाल्याने प्रवासी संघटनांचा नाराजीचा सूर; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

‘वंदे भारत’ ही आठ डब्यांची रेल्वे जालना ते मनमाडदरम्यान यशस्वी चाचणी घेण्यात आली.
Railway junction station platform
Railway junction station platformesakal

मनमाड : जालना येथूनटणारी जालना-मनमाड-मुंबई ही ‘वंदे भारत’ रेल्वेगाडी सुरू करण्यात मराठवाड्यातील नेत्यांना यश आले. मात्र कोरोनापासून बंद असलेली मनमाडची जीवनदायिनी ‘गोदावरी एक्सप्रेस’ सुरू करण्यात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना अपयश आले आहे.

‘गोदावरी एक्सप्रेस’ अद्याप सुरु न झाल्याने प्रवासी संघटनांसह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (tone of displeasure of travel associations as Godavari Express did not start Allegation of neglect of public representatives Nashik)

‘वंदे भारत’ ही आठ डब्यांची रेल्वे जालना ते मनमाडदरम्यान यशस्वी चाचणी घेण्यात आली. शनिवारी (ता. ३०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिचे ऑनलाइन लोकार्पण होणार आहे.

मनमाड रेल्वेस्थानकात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे आदींच्या उपस्थितीत या रेल्वेगाडीचे स्वागत कार्यक्रम होणार आहे.

दरम्यान, जवळपास बऱ्याच रेल्वे गाड्या मराठवाडा, खानदेशातून सोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, मनमाडसह जिल्ह्यातील चाकरमान्यांची जीवनदायी समजली जाणार मनमाड-मुंबई ही ‘गोदावरी एक्स्प्रेस’ गेल्या काही वर्षांपासून म्हणजे, कोरोनापासून रेल्वे प्रशासनाने विविध कारणे देत बंद केली आहे.

Railway junction station platform
Nashik News : भद्रकाली पोलिसांकडून 14 गोवंश जनावरांची मुक्तता

‘गोदावरी एक्स्प्रेस’ पूर्ववत सुरु करावी यासाठी प्रवासी संघटनेसह प्रवाशांनी सातत्याने स्थानिक लोकप्रतिनिधी ते रेल्वे मंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला. तरीही आश्‍वासनांच्या पलिकडे पदरात काहीही पडले नाही.

त्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे. इथून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या पळविल्या जात असून नवीन रेल्वेगाड्या सुरु करण्यात येत आहेत. त्यामुळे रेल्वेचे जंक्शन स्थानक असलेल्या मनमाडमधून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसह प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

त्यामुळे मनमाड-मुंबई ही ‘गोदावरी एक्सप्रेस’ सुरू करावी या मागणीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.

Railway junction station platform
Nashik Road Damage: कौळाणे-नांदगाव रस्त्याची 2 वर्षात दुरवस्था; अरुंद मोऱ्या देताहेत अपघाताला निमंत्रण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com