Godavari River Flood : मुसळधार पावसाने शहराची दैना! १४५ मिलीमीटर पावसाने शहर झाले तलावाचे, अनेक घरांमध्ये पाणी

सोमवार (ता. ६) रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा बुरखा फाडला.
Nashik Godavari River Flood

Nashik Godavari River Flood

sakal

Updated on

नाशिक - सोमवार (ता. ६) रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा बुरखा फाडला. शहरातील रस्ते, गटारे, ड्रेनेज व्यवस्था आणि आपत्कालीन यंत्रणा सर्वच ठिकाणी कोलमडली. एकाच वेळी सिंहस्थासाठी २८ रस्ते खोदून ठेवण्याच्या घाईत महापालिकेने पावसाळ्याची साधी पूर्व तयारीही केली नाही. त्याची किंमत आज सामान्य नाशिककरांना घरात पाणी शिरून आणि रस्त्यावर जीव मुठीत घेऊन जाऊन मोजावी लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com