Kavnai Fort: कावनई किल्ल्यावर पर्यटकांना बंदी; ग्रामपंचायतीने लावला मनाईचा फलक

Notice
Noticeesakal

Kavnai Fort : इगतपुरी तालुक्यातील ऐतिहासिक व पुरातन वारसा लाभलेल्या कावनई किल्ल्याचा वाकी - बिटुर्ली परिसराकडील काही भाग पावसामुळे कोसळल्याने जिल्हा प्रशासन व स्थानिक प्रशासनाने किल्ल्यावर पर्यटकांना बंदी घातली आहे.

तसा फलकही आज ग्रामपंचायतीने लावला आहे. दरम्यान आमदार हिरामण खोसकर यांच्यासह प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. (Tourists banned at Kavnai Fort Gram Panchayat put up prohibition sign nashik)

या ऐतिहासिक किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने शासन, पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून किल्ल्याचा बुरूज व डागडुजी करण्याबाबत तसेच यापुढे या परिसरात कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याबाबत स्थानिकांकडून मागणी कऱण्यात आली.

किल्ल्याचा काही भागातून अद्यापही तुरळक स्थितीत दरड घसरत असल्याचे समजते. प्राथमिक स्तरावरील उपाययोजना म्हणून या किल्ल्याच्या पायथ्याशी झाप करून राहणाऱ्या पाच सहा कुटुंबीयांचे तत्काळ स्थलांतर करण्यात आले आहे.

या भागात शेतीची कामे करण्यासही मज्जाव करण्यात आल्याची माहिती आहे. पर्यटकांना रोखण्यासाठी घोटी पोलिस, वनविभागाचे कर्मचारी तसेच ग्रामसेवक, तलाठी यांचे संयुक्त पथक घटनास्थळी तळ ठोकून आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Notice
Nashik News: छत्रपती शिवाजी स्टेडियम पाडण्यापूर्वी नवीनचे भूमिपूजन! 25 कोटींतून क्रीडा संकुल उभारणार

आमदार खोसकर, मविप्र संचालक संदीप गुळवे, माजी जि. प. सदस्य गोरख बोडके, काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव आदींनी घटनास्थळी पाहणी करीत स्थानिकांशी चर्चा केली.

शेतीचे व पिकांचे झालेले नुकसानीबाबत प्रशासकीय स्तरावर पंचनामे करण्याबाबतच्या सूचना आमदार खोसकर यांनी दिल्या. कावनई, वाकी, बिटुर्ली येथील ग्रामपंचायतींनी आमदारांना निवेदन दिले.

कावनईच्या सरपंच सुनीता पाटील, चेअरमन शिवाजी सिरसाठ, गोपाळ पाटील, पोलिस पाटील, रूपाली शिरसाट, वाकीचे सरपंच किसन कुंदे, निवृत्ती शिरसाठ, किरण रायकर, प्रकाश पाटील, गौतम चंद्रमोरे, ज्ञानेश्वर सिरसाठ, गणेश पाटील, वाकी पोलिस पाटील रोहिदास काळे, सपन परदेशी, खंडू परदेशी, ग्रामसेवक शरद राहाडे, ग्रामसेवक ज्योती केदारे, वनपाल निशा पाटील आदी उपस्थित होते.

Notice
Nashik News: प्रबोधनासाठी 24 तास ‘ऑन ड्यूटी’! पोलिस हवालदार सचिन जाधव यांनी जपले सामाजिक भान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com