Latest Marathi News | परवानगी सुलभीकरणासाठी मार्गदर्शन मागविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC News

Nashik : परवानगी सुलभीकरणासाठी मार्गदर्शन मागविले

नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या परवानग्यांचे सुसूत्रीकरण करण्यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद व पिंपरी चिंचवड महापालिकांची कार्यपद्धती समजून घेतली जाणार आहे. त्यातील नाशिकसाठी सोईस्कर असेल अशा महापालिकेचा पॅटर्न नगररचना विभागात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तेथील महापालिकेच्या कामकाज संदर्भात मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. (town Planning Department of NMC ask Guidance sought for facilitation of permission Nashik News)

हेही वाचा: Nashik : गावठाणातील नागरिकांची मालमत्ता रस्त्यावर

नाशिक महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत बांधकाम, लेआउटसाठी परवानगी दिली जाते. सध्या ऑनलाइन पद्धतीने परवानगीचे धोरण अवलंबण्यात आले आहे. बांधकाम परवानगी किंवा पूर्णत्वाचा दाखला देताना विविध प्रकारच्या तांत्रिक अडचणी येतात. परवानगी मध्ये सुसूत्रीकरण नसते. नगररचना विभागासाठी जारी करण्यात आलेल्या नियमात सातत्य नसते. सोयीनुसार नियमांचे अर्थ काढले जातात.

परवानगीची प्रक्रियादेखील विलंबाने होते. या सर्व प्रश्नांवर तोडगा निघावा, अशी मागणी बांधकाम व्यवसायिकांच्या क्रेडाई व नरेडको या संस्थांकडून महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर निर्णय घेताना आयुक्तांनी मुंबई, पुणे, औरंगाबाद व पिंपरी चिंचवड महापालिकेचे मार्गदर्शन मागविले आहे. बांधकाम परवानगी देण्यासाठीच्या सुलभ प्रक्रिया संदर्भात हे मार्गदर्शन असून, त्यातून नाशिक महापालिकेला सोईस्कर असे धोरण स्वीकारले जाणार आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग; कारचालकाला अटक

टॅग्स :Nashiknmc