Nashik : सात एकर कोबीवर रोटर

उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्याचे पाऊल
Nashik : सात एकर कोबीवर रोटर
Nashik : सात एकर कोबीवर रोटरsakal

ब्राह्मणगाव : येथील प्रगतिशील शेतकरी व ग्रामपंचायत सदस्य अरुण अहिरे यांनी सात एकर क्षेत्रात लागवड केलेल्या कोबीला भाव नसल्याने वैतागून रोटर फिरविला. त्यांचे एकरी लाख रुपयांप्रमाणे सात लाखांचे नुकसान झाले.

सध्या कोबी, फ्लॉवर, शिमला मिरची, टोमॅटोपाठोपाठ कांदा दरात दैनंदिन घसरण सुरू आहे. तर कोबीवर अस्मानी संकट उभे ठाकले आहे. गेल्या वर्षी कोबीला चांगला भाव मिळाल्याने ब्राह्मणगावसह परिसरात अनेक शेतकऱ्यांनी यंदा कोबीची लागवड केली. आधीच पाऊस नाही, जेमतेम पाण्यावर काहींनी पिके जतन केली आणि लागवड केलेल्या कोबीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले. तरीदेखील लागवड केलेली पिके वाचविण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी केली. मात्र, बाजारात कोबी घेण्यासाठी कोणीच तयार नसल्याने शेवटी कंटाळून अरुण अहिरे यांनी त्यांच्या रानमळा शिवारातील सात एकर क्षेत्रात लागवड केलेल्या कोबीवर रोटर फिरवला.

Nashik : सात एकर कोबीवर रोटर
विदर्भात सेनेला धक्का; शेखर सावरबांधे जाणार राष्ट्रवादीत!

परिसरात अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, शिमला मिरची पिकाला भाव नसल्याने व व्यापारीदेखील मिळत नसल्याने शेतातच पडून आहे. एक एकर क्षेत्रात कोबी लागवड करण्यासाठी कोबीची महागडी बियाणे व त्यावर लागवडीसाठी होणारा खर्च, कोबीवर फवारणीसाठी महागडी औषधे, मजुरी पाहता एक लाख रुपये खर्च येतो. सर्वत्र कोबी पिकाची आवक, असलेला बाजारभाव व मागणी नसल्याने शेतकऱ्यांचा माल शेतातच पडून आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

Nashik : सात एकर कोबीवर रोटर
गाळात गेलेल्या विहिरी पुन्हा दिसू लागल्या...

गेल्या वर्षी कोबीला चांगला भाव असल्याने यंदाही कोबीला चांगला भाव मिळेल, या आशेने कोबीची लागवड केली. परंतु, उत्पादन खर्च पाहता व बाजारभाव नसल्याने पदरी निराशा पडली. त्यामुळे सात एकर क्षेत्रात कोबी पिकावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटर फिरवावा लागला. हातातोंडाशी आलेला घास दर कोसळल्याने हिरावून घेतला आहे. कोबी पिकासाठी झालेला खर्च, फवारणीसाठी महागडी औषधे, मजूर पाहता देणी देणे अवघड झाले आहे.

- अरुण अहिरे, शेतकरी, ब्राह्मणगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com