Tractor Pujan at Bail Pola Festival
sakal
वणी (नाशिक) - शेतकऱ्यांच्या जीवनाशी आणि कृषी संस्कृतीशी घट्ट नाते असलेल्या पोळा सणाचे स्वरूप काळानुरूप बदलताना दिसत आहे. एकेकाळी पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढणारे शेतकरी आता आधुनिक शेतीच्या युगात ट्रॅक्टरला आपला शेतीचा साथीदार मानू लागले आहेत. याची प्रचिती दिंडोरी तालुक्यातील शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेल्या खोरीपाडा येथे आली. गावातील शेतकऱ्यांनी यंदा बैल मिरवणुकीऐवजी सजविलेल्या ट्रॅक्टरची रॅली काढून आगळ्यावेगळ्या पद्धतीने पोळा सण साजरा केला.