
नाशिक : ट्रॅक्टर, दुचाकी चोर गजाआड; 21 लाखांचा मुद्देमाल जप्त
अभोणा (जि. नाशिक) : दोन ट्रॅक्टर व सात दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अभोणा पोलिसांनी शिताफीने गजाआड केले. त्याच्याकडून २१ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून धडक कारवाई करण्यात आली आहे.
सोमवारी (ता. ७) रात्री दीडच्या सुमारास अभोणा येथे पोलिस गस्तीच्यादरम्यान प्रकाश वामन चव्हाण (वय ३२, रा. बोरदैवत, ता. कळवण) याच्या ताब्यात असलेल्या व नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता तांत्रीक तपासावरुन सदर दुचाकी पोलिस आयुक्तालय औरंगाबाद शहर, वाळुंज एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतून चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले. संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, त्याची कसून चौकशी केली असता त्याचा जोडीदार घरफोडी व वाहन चोरीतील सराईत गुन्हेगार राजेश रामशंकर शर्मा (रा. निचम, मध्यप्रदेश, हल्ली रा. आनंदवाडी, सुभाषनगर, मनमाड) याने औरंगाबाद, वाळुंज, विरगाव, वैजापूर भागातून चोरी करुन आणलेल्या सात दुचाकी व दोन ट्रॅक्टर असा एकूण २१ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
हेही वाचा: 'ई-चालान'चा दंड भरण्याची नोटीस! 80 लाख वाहनांवर 997 कोटींचा दंड
पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले. अपर पोलिस अधिक्षक माधुरी कांगणे, अमोल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे अभोण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे, पोलिस हवालदार नितीन गांगोडे, निलेश शेवाळे, सुमित आवारी, संतोष सोनवणे, विजय भोये, कुमार जाधव, समाधान शेवरे, विठ्ठल धोंगडे, आशिष बागूल यांनी कारवाई केली.
हेही वाचा: मालेगावात लुटारूंकडून धक्कादायक प्रकार; पोलिसांवर गोळीबार
Web Title: Tractor Two Wheeler Thief Arrested By Police Nashik Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..