मालेगाव- मुंबई-आग्रा महामार्गावरील कांकरिया शो रूमच्या विरुद्ध बाजूला मालेगावच्या व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रकार घडला. त्यांच्याकडून २५ लाख रुपये रोख चोरुन नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. .शहरात घरफोडी, दुचाकी, मोबाईल तसेच व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रकार घडतात. महिनाभरात मोठी चोरी शहरात झाली नाही. मार्च महिन्यातील सर्वात मोठी चोरी आहे. मनोज चांदमल मुथ्था (वय ४३, रा. स्वामी समर्थ केंद्रासमोर, मालेगाव) हे त्यांच्या संकेत किराणा दुकानातून खरेदी विक्री करून रोख रक्कम घेऊन सायंकाळी घरी येत होते. घरी येत असताना मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळ्याकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर कांकरिया शो रूमच्या विरुद्ध बाजूला गतिरोधकावर सहा अज्ञात इसमांनी त्यांची चार चाकी वाहन थांबवले. .मनोज व त्यांच्या भावाला या भामट्यांनी शिवीगाळ केली. तसेच त्यांना धारदार हत्यार दाखविले. त्यांच्या कारच्या काचा फोडून चोरट्यांनी २५ लाख रुपये रोख व विक्री रजिस्टर असा ऐवज पळवून नेला आहे. घटनेची माहिती समजताच अप्पर पोलिस अधिक्षक तेगबीरसिंह संधू व उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांनी घटनास्थळी भेट दिली. .याठिकाणी श्वान पथकाला पाचपण करण्यात आले. तसेच फिंगर प्रिंट्स घेण्यात आले. या प्रकारामुळे शहरातील व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या प्रकारात सहा जण असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हे सर्व जण २५ ते ३० वयोगटातील होते. रविवारी (ता. २३) रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. मनोज मुथ्था यांच्या तक्रारीवरून किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे तपास करीत आहेत. चोरट्यांचा लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी होत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.