खेळामुळे व्यक्तिमत्व विकास

खेळामुळे व्यक्तिमत्व विकास
Published on: 
धुळे टुडे २ साठी अँकर... --- फोटो- NSK26H33773 धुळे : विद्यावर्धिनी महाविद्यालयात आयोजित नशामुक्त युवा आणि पारंपरिक क्रीडा दिनाच्या कार्यक्रमात बोलतांना प्राचार्य डॉ. जगदीश पाटील. शेजारी इतर मान्यवर. --- खेळांमुळे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास --- प्राचार्य डॉ. पाटील; नशामुक्त युवा अभियान, पारंपरिक क्रीडा दिन --- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २८ : विविध खेळांमुळे सामाजिक सलोखा वाढतो आणि मानवतेची भावना दृढ होऊन व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा व सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेतून प्रेरणा घेत विद्यावर्धिनी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘नशामुक्त युवा-विकसित भारत, १०० आठवड्यांचा संकल्प अभियान’ अंतर्गत पारंपरिक क्रीडा दिवस साजरा झाला. प्राचार्य पाटील अध्यक्षस्थानी होते. क्रीडा संचालक डॉ. कैलास बोरसे प्रमुख पाहुणे होते. उपप्राचार्य डॉ. वाय. जी. पाटील, डॉ. आर. आर. गावित, डॉ. राजीव आरके, प्रा. देविदास चौधरी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले, खेळामुळे केवळ शारीरिक विकासच होत नाही, तर मानसिक विकासालाही चालना मिळते. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सहकार्य, मैत्रीभाव, संघभावना आणि खिलाडूवृत्ती विकसित होते. देशी खेळांचे महत्व डॉ. बोरसे यांनी देशी व पारंपरिक खेळांचे महत्त्व विशद केले. कबड्डी, खो-खो, लगोरी आणि रस्सीखेच यांसारखे पारंपरिक खेळ कमी जागेत व कमी खर्चात खेळता येतात. उपलब्ध खेळाडूंच्या संख्येनुसार विविध गटांमध्ये खेळ होतात, या खेळांमुळे शारीरिक तंदुरुस्ती, चपळता, निर्णयक्षमता, संघभावना आणि सहकार्याची वृत्ती विकसित होते. देशी खेळांचे जतन व संवर्धन केल्यामुळे भारतीय संस्कृती आणि पारंपरिक क्रीडा वारशाचे संरक्षण होते, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. बाजीराव पाटील यांनी युवकांनी व्यसनांपासून दूर राहून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी, सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा आणि पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक जगदीश मरसाळे यांनी व्यसनांचे दुष्परिणाम अधोरेखित करणारे एकपात्री नाटक सादर केले. पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने मियावाकी घनवनातील झाडांची निगा व संवर्धन या उपक्रमावर विशेष भर देण्यात आला. डॉ. निलेश रोटे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. देविदास चौधरी यांनी आभार मानले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com