traffic crackdown
sakal
नाशिक: शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी, तसेच वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुख्यालय तथा शहर वाहतूक शाखेच्या नवीन उपायुक्त किरीथिका सीएम यांनी स्वतः रस्त्यावर उतरत वाहतुकीचा आढावा घेतला. तसेच शहर वाहतूक युनिट दोनमधील रिक्षाचालकांना पाचारण करीत वाहतुकीच्या शिस्तपालन करण्यासंदर्भात तंबीवजा सूचना केल्या.