नाशिक- वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करताना वाहतूक पोलिसांकडून मोबाईलचा वापर केला जातो. यासंदर्भात वाहनचालकांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत पोलीस महासंचालक कार्यालयानेच वाहतूक पोलिसांना बेशिस्त वाहनचालकांविरोधात कारवाई करताना मोबाईलचा वापर करण्यात मनाई करण्यात आल्याचे आदेश जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतही वाहतूक पोलिसांनी ई-चलान मशिनचा वापर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिले आहेत.