harising pawar
sakal
वणी - उत्तर महाराष्ट्राचे शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगड येथे मंगळवारी (ता. २८) सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. ब्राह्मणवेल (ता. साक्री, जि. धुळे) येथील हरिसिंग रायसिंग पवार (वय-३४) या दिव्यांग तरुणाने शीतकड्यावरून उडी मारून आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, पहिल्या उडीनंतर जखमी अवस्थेत अडकलेल्या या तरुणाने बचावकार्य सुरू असतानाच स्वतःला सरकवत पुन्हा खोल दरीत झोकून दिले.