अजमीर सौंदाणेतील तीन चुलत भावांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार कुटुंबाचा आधारवड हरपल्याने नातेवाइकांचा आक्रोश

अजमीर सौंदाणेतील तीन चुलत भावांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार कुटुंबाचा आधारवड हरपल्याने नातेवाइकांचा आक्रोश
Published on: 
पान-३ मुख्य अंक ------- ३०-२ अजमीर सौंदाणेच्या तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार ------------- कर्ते पुरूष गेल्याने कुटुंबीयांना शोक अनावर ------------- सकाळ वृत्तसेवा जुनी शेमळी, ता. २५ : राजस्थान येथे कुलदैवताच्या दर्शनासाठी गेलेल्या अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील मगर परिवारातील तीन चुलत भावांचा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. दीपक मगर (६६), संदीप मगर ( ५३) आणि महेश मगर (५०) या तिघांवर रविवारी (ता.२५) एकाच ठिकाणी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबातील कर्ते पुरुष काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. जयपूरजवळ झालेल्या अपघातात मगर परिवारातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर कुटुंबातील काही सदस्यांसह अन्य भाविक जखमी झाले. दीपक मगर हे निवृत्त कृषी अधिकारी होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असून तिन्ही मुले विवाहित व नोकरीला आहेत. त्यांच्या पत्नीही जखमी असून जयपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संदीप मगर यांच्यामागे आई, पत्नी आणि दोन मुले आहेत. एक मुलगा नोकरीस असून दुसरा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. महेश मगर यांच्यामागे आई-वडील, पत्नी आणि दोन मुले शिक्षण घेत आहेत. तिन्ही चुलत भावांचे मृतदेह गावात दाखल होताच गावकऱ्यांनी एकच आक्रोश करत अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. तिन्ही भावांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याने प्रत्येक जण हळहळत होता. गावातील जयपूर येथे नोकरीस असलेले गोकूळ अहिरे, पंडित पवार , सुनील अहिरे यांनी जखमी भाविकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. अंत्यविधीप्रसंगी माजी आमदार संजय चव्हाण, बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष बंडूकाका बच्छाव, भाजपचे नेते डॉ. विलास बच्छाव, डॉ. दिनेश बच्छाव, नगरसेवक विलास दंडगव्हाळ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com