नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गावर मुंढेगाव फाट्यावर भीषण अपघातात ४ भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याने काही काळ वाहतुक ठप्प झाली होती. गुरु पोर्णिमाच्या दिवशीच या भाविकांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे..गुरुवार (ता. १० रोजी ) गुरुपोर्णिमेनिमित्त मुंबई, अंधेरी येथील ८ ते १० भाविक दोन खाजगी कारने शेणवड, गरुडेश्वर येथील माऊली रामदासबाबा मठातील मंदिरात दर्शनासाठी आले होते. दुपारी दर्शन झाल्यावर मुंबई येथे जाण्यासाठी दुपारी २ वाजेच्या सुमारास निघाले असता काळाने घाला घातला व या भाविकांच्या एका इको गाडीवर भरघाव वेगाने केमिकलची राख घेऊन जाणाऱ्या कंटेनरने इको गाडीला कंटेनर खाली दाबून कंटेनर पुढे फरफटत जाऊन पलटी झाला..या अपघातात इको गाडीत बसलेले भाविक दाबले जाऊन दोन महिला आणि दोन पुरुष अशा चार जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले..तसेच महामार्ग सुरक्षा पोलीस व टोलनाका टीम कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. क्रेनच्या सहाय्याने गाडीखाली दबलेले मृतदेह बाहेर काढून सर्व मृतदेह घोटीच्या ग्रामिण रुग्णालयात पाठविण्यात आले.नाशिक मुंबई महामार्गावर गोंदे दुमाला ते पिंप्रीसदो या दरम्यान सहा पदरी करणाचे काम सुरू असून रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने कुठलेही दिशादर्शक फलक लावलेले नसुन अनेक ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यात जमा होत आहे. काम सुरू असल्याने आत्तापर्यत या ठिकाणी अनेक अपघात झाले असुन अनेक दुचाकी चालकांना आपले प्राण गमवावे लागले आहे..गेल्या सहा महिन्यांत मुंढेगाव येथेच इगतपुरी व घोटी शहरातील ६ ते ७ युवकांचा बळी गेला आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षरशा दुर्लक्ष होत असल्याने ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत असल्याने आता किती नागरिकांचे बळी घेणार असा संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सिमेंट घेऊन जाणारा कंटेनर MH 15 JW 1090 ने इको गाडी क्रमांक MH 02 CV 5230 या गाडीवर जोरात आदळल्याने इको गाडीतील सर्व प्रवासी जागीच दबुन गेले..या अपघातात अंधेरी येथील भाविक नित्यानंद जनार्दन सावंत, वय ६२ वर्ष, विद्या जनार्दन सावंत, वय ६५ वर्ष, मिना जनार्दन सावंत, वय ६८ वर्ष व इको चालक दत्ता अंबराळे, वय ४२ वर्ष, सर्व राहणार अंधेरी, मुंबई हे जागीच ठार झाले.अपघातस्थळी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन मदत कार्य केले.या अपघातात ठार झालेले एकाच कुटुंबातील असुन एक भाऊ व दोन बहीणींचा समावेश आहे. अपघातामुळे व बघ्यांची गर्दी झाल्यामुळे दोन्ही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग सुरक्षा पोलीसांनी ही वाहतुक कोंडी सुरळीत केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.