पान-१
-----------
राजेंद्र माने ः MLN26B16175
बालाबाई माने -MLN26B16176
भटाबाई माने - MLN26B16177
------
MLN26B16178
मालेगाव : अपघातात मृत्यमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करताना शिक्षणमंत्री दादा भुसे.
-----------------
माता-पित्यासह मुलीचा अपघाती मृत्यू
---------
टिंगरीजवळ टेम्पोची धडक ः वरसंशोधनाहून परतताना घटना
------------
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता.२९ : मालेगाव- कुसुंबा रस्त्यावर टिंगरी वनपट फाट्याजवळ भरधाव पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मातापित्यासह मुलीचा मृत्यू झाला. हे तिघे तिसगाव-ढंडाणे (ता. धुळे) येथील रहिवासी असून मुलीसाठी वर पाहण्यासाठी नांदगाव येथे गेले होते, तेथून दहिदी मार्गे परतत असताना हा अपघात झाला. एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान पीकअपचालकाला ताब्यात घेण्यात आले असून पीकअपही जप्त करण्यात आला आहे.
------------------
या घटनेची माहिती समजाताच शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पिडित कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. पोलिसांनी पिकअपचालकाला ताब्यात घेतले आहे. तालुका पोलिस ठाण्यात चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालेगाव - कुसुंबा रस्ता हा पुर्णपणे सिमेंट कॉंक्रीटीकरण झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दोन महिन्यापुर्वी मालेगावसह परिसरात तीन अपघात झाले. राजेंद्र नाना माने (वय ४५), बालाबाई राजेंद्र माने (वय ३५), भटाबाई राजेंद्र माने (वय १८) हे तिघे जण दुचाकीने (एमएच १८ एएल २१५०) नांदगावहून धुळे जिल्ह्यातील चिंचवार येथे जात होते. तिघांवर काळाने झडप घातली. त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअपने (एमएच ०४ एचवाय ०२०३) जबर धडक दिली. अपघातात तिघे गंभीर जखमी झाले. रुग्णवाहिकाचालक धिरज कचवे याने त्यांना तातडीने सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. पोलिसांनी पिकअपचालक सागर यशोनाथ थोरात (वय २७, रा. कंक्राळे, ता. मालेगाव) याला ताब्यात घेतले. पिकअपदेखील जप्त करण्यात आली आहे. सदर घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक दामोदर काळे करीत आहेत.
-----
चौकट
शिक्षणमंञ्यांची भेट
घटनेची माहिती समजताच शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सामान्य रुग्णालयात जाऊन अपघातात मृत्यमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. अपघाता संदर्भात पोलिसांशी चर्चा करुन कारवाई करण्याच्या सूचना केल्या.