वडांगळी - पंचाळे (ता.सिन्नर ) येथील शिवारात रंगपंचमी निमित्त कानिफनाथ यात्रोत्सवात शर्यतीत बैल घोडा टांगा पाटी जवळ आला असताना शेजाराच्या टांग्याचा धक्का लागला.त्यामुळे बिथरलेल्या बैल घोडा सैरभैर पळून शेततळ्यात पडला.शेततळ्याच्या प्लास्टिक आच्छादन वरून बैलाचा पाय सरकलेल्याने बैल घोड्याचा बुडून मृत्यू झाला आहे.करंजी (ता निफाड) येथील शेतकऱ्याचे पवन व विजू गोत्हा बैल घोडा आहे. टांगा शौकीन सह ग्रामस्थासाठी मन हेलावून टाकणारी घटना रंगपंचमीच्या आदल्या दिवशी घडली आहे.