

Three-Hour Rescue Drama Ends in Tragedy in Awahana-Khedi River Incident
sakal
जळगाव : दिवस उजाडताच नित्याच्या शेतीकामासाठी नेहमीप्रमाणे शेतकरी-सालदार बैलजोड्यासह मंगळवारी (ता. १२) गिरणा नदी ओलांडत होते. नदीपात्रातील कंबरेएवढ्या पाण्यातून जाताना अचानक बैलांसह गाडे उचकटून बुडाले. या दुर्घटनेत दिलीप रामभाऊ कल्याणकर (वय ५५) यांचा मृत्यू ओढवला. गाडे बैलांसकट बुडल्याने बैलही मृत्युमुखी पडले.