घात - अपघात

घात - अपघात
Published on: 
घात अपघात गुन्हे ----------------- शेततळ्यात बुडाल्याने पाडळदेत ज्येष्ठाचा मृत्यू मालेगाव : पाडळदे (ता. मालेगाव) येथील दिलीप बळवंत कुलकर्णी (वय ६५) यांचा शेततळ्यात बुडाल्याने मृत्यू झाला. ९ ऑक्टोबरला सायंकाळी पाचला सुरेश शंकर मंडळ यांच्या शेतातील शेततळ्यात पाय घसरून ते पडले. ग्रामस्थांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले. ज्ञानेश्वर भगतसिंग झिंजर यांनी बेशुद्ध अवस्थेत त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. ओम जाधव यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. वळवाडे परिसरातून अर्धा ब्रास वाळू जप्त मालेगाव : वळवाडे (ता. मालेगाव) शिवारातील मोसम नदीपात्रातून पोलिसांनी अर्धा ब्रास वाळू आणि ट्रॅक्टर असा सहा लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रुपेश भारत पवार (रा. वळवाडे) याच्या ताब्यातून चार हजार रुपये किमतीची वाळू आणि सहा लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर (एमएच ४१ एझेड ७१२०) जप्त करण्यात आला. ८ ऑक्टोबरला रात्री आठला ही कारवाई झाली. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून रुपेश पवार फरार आहे. मका पिकावर फवारणीच्या संशयातून दोघांना मारहाण मालेगाव : मका पिकावर फवारणी केल्याच्या संशयातून सावतावाडी (ता. मालेगाव) येथे दोघांना मारहाण केल्याची घटना घडली. ज्ञानेश्वर धर्मा बुनगे (वय ४६) व त्यांचा साथीदार शेतात काम करीत असताना दिलीप धर्मा बुनगे व समाधान दिलीप बुनगे (दोघे रा. सावतावाडी) तेथे आले.‘तुम्ही माझ्या मक्याच्या पिकावर काहीतरी फवारणी केली. त्यामुळे पिकाचे नुकसान झाले,’ असे म्हणत दोघांनी शिवीगाळ केली. हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने दोघांना मारहाण केली. ‘आमच्या नादी लागल्यास येथेच मारून टाकू,’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संगमेश्वर भागातून दुचाकी लंपास मालेगाव : संगमेश्वर भागातील आंबेडकर चौक परिसरात राहणारे जावेद अहमद मोहम्मद मुस्तफा (वय ५७) यांची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. ७ ऑक्टोबरला रात्री दीडच्या सुमारास हुसैनी हॉटेलच्या पाठीमागे दुचाकी उभी केली होती. चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com