नाशिक- शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षण विभागांतर्गत उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांची रिक्त जागांची, तसेच बदलीपात्र अधिकाऱ्यांची माहिती जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यात १२४ उपशिक्षणाधिकारी व २२१ गटशिक्षणाधिकऱ्यांसह ५०० हून अधिक जागा रिक्त असल्याचे उघडकीस आले आहे.