गौरव जोशी : नाशिक- गौणखनिज प्रतिष्ठानच्या निधीतून मतदारसंघातील विकासकामांचे स्वप्न पाहणाऱ्या लोकप्रतिनिधींना जिल्हास्तरीय समितीने दणका दिला आहे. प्रतिष्ठानकडे सादर केलेल्या ९१४ प्रस्तावांमधून केवळ १३८ कामांना मान्यता देताना १९ कोटी ४४ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून नवीन वर्गखोल्या उभारणी, वर्गखोल्या दुरुस्ती, १०० शाळांमध्ये पाण्याचे फिल्टर बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे.