रोहित्र बिघाडाची तक्रार आता एका क्लिकवर

रोहित्र बिघाडाची तक्रार आता एका क्लिकवर
Published on: 
ॲंकर NSK26H31598 : एआय छायाचित्र ---- शीर्षक रोहित्र बिघाडाची तक्रार आता एका क्लिकवर ‘महावितरण’च्या ॲपवर सुविधा; छायाचित्रासह ‘लोकेशन’ची मिळणार माहिती सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ७ : शेतातील किंवा गावातील रोहित्र (ट्रान्स्फॉर्मर) अचानक बंद पडल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यास तक्रार कुठे करायची, यासाठी आता वीजग्राहकांना कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही. नादुरुस्त रोहित्राची माहिती थेट ‘महावितरण मोबाईल ॲप’वरून एका क्लिकमध्ये देता येणार आहे. विशेष म्हणजे, संबंधित रोहित्राचे छायाचित्र आणि ठिकाणाचे लोकेशनही ॲपद्वारे पाठविता येणार असल्याने तक्रारीवर तातडीने कार्यवाही करणे महावितरणला शक्य होणार आहे. राज्यातील सुमारे ९ लाख २५ हजार वितरण रोहित्रांचे जिओ-लोकेशनसह मॅपिंग पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहक रोहित्राजवळ जाऊन ॲपच्या माध्यमातून त्याची माहिती सहज नोंदवू शकतो. ही सुविधा जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आणि इतर वीजग्राहकांसाठीही उपयुक्त ठरणार आहे. तसेच महावितरणच्या ॲपसोबतच १९१२, १९१२०, १८००२१२३४३५ आणि १८००२३३३४३५ या क्रमांकांवर तसेच महावितरणच्या संकेतस्थळावरूनही तक्रार नोंदविता येणार आहे. अशी पाठवा तक्रार तक्रार नोंदविण्यासाठी ॲपमध्ये ग्राहक क्रमांकाने प्रवेश करण्याची आवश्यकता नाही. ‘गेस्ट’ म्हणूनही माहिती देता येते. मोबाईलचे लोकेशन सुरू करून ‘नादुरुस्त रोहित्राची माहिती नोंदवा’ हा पर्याय निवडावा. त्यानंतर नाव व मोबाईल क्रमांकाची नोंद करून प्राप्त झालेला ओटीपी भरावा. पुढे नादुरुस्त रोहित्राचा फोटो काढून तो ॲपवर नोंदविता येतो. नकाशावर संबंधित रोहित्राचा क्रमांक व ठिकाणाची माहिती दिसल्यानंतर तक्रार पाठविता येते. चौकट ॲपवर मिळते माहिती तक्रार दाखल होताच संबंधित अभियंता आणि जनमित्रांना मोबाईलवर संदेश मिळतो. दोष किरकोळ असल्यास दुरुस्ती, तर रोहित्र पूर्णपणे नादुरुस्त असल्यास ते बदलण्याची कार्यवाही केली जाणार आहे. कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर तक्रारदारालाही व्हॉट्सॲपवर माहिती दिली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com