SMD26B01148
सामोडे : खासदार पाडवी यांनी उपलब्ध करून दिलेला ट्रान्सफॉर्मर आणताना शेतकरी रमेश घरटे, रोहिदास पगारे, उमेश घरटे, शिवाजी चौधरी, शौकत शहा, भाऊसाहेब घरटे, विलास घरटे आदी.
---------------
जळालेला ट्रान्सफॉर्मर
एका दिवसात उपबल्ध
खासदार गोवाल पाडवी यांचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
सामोडे, ता. ३ : सामोडे येथील शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी वापरण्यात येत असलेला १०० केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर खासदार ॲड. गोवाल पाडवी यांनी तत्काळ नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिला. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी विज वितरण कंपनीची संपर्क साधला. त्यावेळी किमान आठ ते दहा दिवस ट्रान्सफॉर्मर मिळणार नाही. शिवाय त्याआधी पैसे जमा करा, असे सांगण्यात आले. सर्व शेतकऱ्यांनी खासदार पाडवी यांना परिस्थिती सांगितली. त्यानंतर पाडवी यांनी विज वितरण कंपनीच्या वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर त्याच दिवशी १०० केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करू दिल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आता परिसरातील शेतकऱ्यांना शेतीपंपांसाठी अधिक स्थिर व सुरळीत वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार असून, शेतीच्या कामांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एरवी ट्रान्सफॉर्मर जळाला की शेतकऱ्यांना किमान दहा ते बारा दिवस नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी प्रतीक्षा करावी लागत होती. अशावेळी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यास मोठी अडचण निर्माण होत. पैसे जमा करूनही सतत चकरा मारावा लागत होत्या. मात्र, खासदार पाडवी यांनी तत्काळ दखल घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचे शेतकरी रमेश घरटे यांनी सांगितले.