मालवाहतूक वाहनांच्या खरेदी-विक्रीत ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची ८० लाखांची फसवणूक

मालवाहतूक वाहनांच्या खरेदी-विक्रीत ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची ८० लाखांची फसवणूक
Published on: 
ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाची ८० लाखांची फसवणूक सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. ८ : मालवाहतूक वाहने खरेदी-विक्रीच्या व्यवहारात विश्वास संपादन करून हैदराबाद येथील ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाची सुमारे ७९ लाख ५३ हजार २०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जुने नाशिकमधील अजहर युनुस मणियार याच्यासह चौघांविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा यादगिरी नागु यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. २५ सप्टेंबर २०२४ ते १२ जुलै २०२६ या कालावधीत द्वारका सर्कल परिसरात व्यवहार झाला. संशयित अजहर युनुस मणियार (रा. काझीपुरा) तरुण शर्मा (रा. भंडारा), मोहम्मद युनूस मोहम्मद कय्यूम (रा. हैदराबाद) आणि रफिक मन्सुरी (रा. नालासोपारा) यांनी संगनमत करून तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला. त्यांना मालवाहतूक वाहने खरेदी करण्यास प्रवृत्त केले. संशयितांकडून आयशर कंपनीची सहा, अशोक लेलॅन्ड कंपनीची एक आणि महिंद्रा कंपनीची बोलेरो एसी कंटेनर अशी एकूण आठ वाहने खरेदी करण्यासाठी तक्रारदार यांनी ७९ लाख ५३ हजार २०० रुपये त्यांना दिले. मात्र, महिंद्रा बोलेरो एसी कंटेनर (एमएच ४७ ओएस ९८३९) या वाहनाचा ताबा अद्याप देण्यात आलेला नाही. तसेच अन्य वाहनांच्या हस्तांतरणासाठी आवश्यक कागदपत्रे, क्लिअरन्स प्रमाणपत्रे, ना हरकत प्रमाणपत्रे (एनओसी) आणि परिवहन विभागाच्या परवानग्याही देण्यात आल्या नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आहे. विशेष म्हणजे, खरेदी केलेल्या चार वाहनांबाबत अन्य ठाण्यांमध्ये यापूर्वीच तक्रारी दाखल होत्या. तक्रारदाराला विकण्यात आल्यानंतर संबंधित ठाण्यांच्या पथकांनी ती त्यांच्या ताब्यातून जप्त केली. त्यामुळे वाहन खरेदीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याचे तक्रारदारांच्या लक्षात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.